Friday, January 10, 2025
Homeराजकीयनोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांची नरखेड कार्यालयाला भेट...

नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांची नरखेड कार्यालयाला भेट…

नरखेड – अतुल दंढारे

महाराष्ट्र राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर यांनी नरखेड दुय्यम निबंधक , नोंदणी व मुद्रांक विभाग नरखेड कार्यालयाला भेट दिली. नोंदणी उपमहानिरीक्षक आर जी राऊत , सहजिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी एस ऐ तरासे हेही हजर होते.

कार्यालयाच्या नवीन इमारतीची पाहणी करून आढावा घेतला व एक महिन्याच्या आत इमारतीचे काम पूर्ण करून नोंदणी विभागाला हस्तांतरण करून देण्याबाबत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. दुय्यम निबंधक विक्रांत आंब्रस्कर , संगणक संचालक प्रवीण काकडे, गिरीश वाटकर , शुभांगी कांबळे यांनी सर्व अधिकाऱ्यांचे स्वागत करून त्यांना नरखेड कार्यालया बाबत माहिती दिली.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: