एकरात मिळतो तीन लाखाचा उत्पन्न : लागवड करण्याचे आव्हान
पातूर : जिल्हा रेशीम विभाग अंतर्गत शेतकऱ्यांना तुती वृक्ष लागवड करण्यासाठी मोफत तुतीचे वृक्ष दिले जातात, त्यासाठी शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर शेडही बांधून दिले जाते, एकरात शेतकऱ्यांना जवळपास तीन लाखाचा उत्पन्न मिळतो, याचा उत्पन्न घेण्यासाठी खेट्री शिरपूर येथील अनेक शेतकऱ्यांनी तूती वृक्षाची लागवड करण्यात आली, जिल्हा रेशीम विभागाचे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक हरसुले, वरिष्ठ क्षेत्र सहाय्यक अनिल सुळकर यांनी नुकतेच पाहणी केली आहे. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त उत्पन्नाचा लाभ घ्यावा असे आव्हान जिल्हा रेशीम विभागाचे तांत्रिक सहाय्यक व क्षेत्र सहाय्यक तसेच सरपंच जहूर खान यांनी केले आहे.
प्रतिक्रिया
एकरात शेतकऱ्यांना तूतीचा तीन लाखापर्यंत उत्पन्न मिळतो त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त तुती लागवड करावी आणि जास्त उत्पन्नाचा लाभ घ्यावा…
जहूर खान सरपंच खेट्री