Sunday, December 22, 2024
Homeराज्यविभागीय आयुक्तांकडून शेगाव येथील अतिक्रमणाची पाहणी...

विभागीय आयुक्तांकडून शेगाव येथील अतिक्रमणाची पाहणी…

बुलडाणा – शेगाव येथील अतिक्रमणाची विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आज पाहणी केली. शेगाव येथील पालखीच्या पार्श्वभूमीवर ही पाहणी करण्यात आली. शेगाव शहरात दरवर्षीप्रमाणे श्री गजानन महाराजांच्या पालखीचे पंढरपूर येथून आगमन झाले. शेगाव येथे पालखी आल्यावर शहरात श्रींचा पालखी सोहळा उत्सव साजरा करण्यात येतो. त्यानुसार आज दि.११ ऑगस्ट रोजी पालखी पोहचली. त्याअनुषंगाने श्री गजानन महाराज मंदिराच्या पालखी सोहळ्याची पूर्वतयारी करण्यात आली.

गेल्या दोन दिवस शेगाव शहरात नगर परिषद कर्मचारी तसेच पोलीस प्रशासनासमवेत अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात आली. शहरातील रेल्वे स्टेशन ते श्री गजानन महाराज मंदिर परिसरामधील अतिक्रमण हटवून शेगावात येणाऱ्या भाविक भक्तांसाठी रस्ता मोकळा करुन देण्यात आला. तसेच पालखीच्या दिवशी अतिक्रमण होऊ नये यासाठी अतिक्रमण मोहिम राबविण्यात आली. शेगाव शहरातील साफसफाईची कामे जलतगतीने स्वच्छ करण्याची कामे नगर परिषदमार्फत करण्यात आलीत.

विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरी, खामगाव, मुख्याधिकारी जयश्री काटकर यांनी श्री गजानन महाराज संस्थान सभोवतालच्या परिसराची पाहणी केली. त्यानंतर श्री गजानन महाराज संस्थामध्ये असलेल्या पोलिस मदत कक्षाला भेट दिली.

यावेळी पालखी मार्गाची पाहणी करण्यात आली. पाहणीनंतर नगर परिषदेमार्फत गांधी चौक येथे माझी वसुंधरा अंतर्गत आयोजित सार्वजनिक जनजागृती कार्यक्रमाला भेट दिली. जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी श्री गजानन वाटिका येथे वारकरी शिक्षण संस्था येथे जाऊन पालखीचे दर्शन घेतले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: