Sunday, December 22, 2024
Homeराज्यविद्यार्थी विषबाधा प्रकरणी चौकशीचे आदेश कांबळे, भिसे; शालेय शिक्षण मंत्र्यांकडून गंभीर दखल...

विद्यार्थी विषबाधा प्रकरणी चौकशीचे आदेश कांबळे, भिसे; शालेय शिक्षण मंत्र्यांकडून गंभीर दखल…

सांगली – ज्योती मोरे.

सांगलीतील वानलेसवाडी येथील खासगी शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहारातून झालेली विषबाबाधा घटनेची शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी गंभीर दखल घेतली आहे. या घटनेच्या चौकशीचे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. चौकशी नंतर पोषण आहार ठेकेदारावर कडक कारवाईचे करू अशी ग्वाही ना. केसरकर यांनी दिली आहे अशी माहिती युवासेना जिल्हाप्रमुख (बाळासाहेबांची शिवसेना) सचिन कांबळे, मनोज भिसे यांनी दिली.

कांबळे, भिसे म्हणाले, दोन दिवसांपूर्वी वानलेसवाडी येथील एका खासगी शाळेतील ३५ विद्यार्थ्यांना पोषण आहारातून विषबाधा झाल्याचे समोर आले होते. पोषण आहाराचे सेवन केल्या नंतर विद्यार्थ्यांना मळमळणे, पोटदुखी, डोकेदुखी आणि उलट्यानांचा त्रास होऊ लागला.

त्यांच्यावर वेळीच उपचार झाल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला. अन्न व औषध प्रशासनाने आहाराचे नमुने घेतले आहेत. त्यातून विषबाधा कशामुळे झाली हे स्पष्ट होईलच पण ठेकेदाराचा हलगर्जीपणाही याला कारणीभूत आहे. याबाबत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची कोल्हापूर येथे भेट घेतली.

या घटनेची सखोल चौकशी करावी. संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी मंत्री केसरकर यांच्याकडे केली असल्याचे सांगत कांबळे व भिसे म्हणाले, मंत्री केसरकर यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी तात्काळ अधिकाऱ्यांकडून या घटनेची माहिती घेतली.

विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करावी. प्रसंगी परवाना रद्द करावा असे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत, असेही कांबळे व भिसे यांनी सांगितले. युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष आकाश माने यावेळी उपस्थित होते..

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: