Monday, December 23, 2024
Homeराज्यअनंत हेअर स्टाईल ची अभिनव स्टाईल...

अनंत हेअर स्टाईल ची अभिनव स्टाईल…

बोटाची शाई दाखवणारांची केली मोफत कटिंग..!

अकोला – संतोषकुमार गवई

मतदार जनजागृती अभियानांतर्गत लोकशाही अधिक बळकट करण्याकरीता मतदानाची टक्केवारी अधिक वाढावी यासाठी अनंता कौलकार यांच्यावतीने बोटाची शाई दाखवा आणि मोफत कटिंग करा हा उपक्रम राबविण्यात आला.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नागरीकांमध्ये अधिकाधिक जनजागृती होवून त्यांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी रेल्वेस्थानक परीसरात रामदास पेठ परीसरात असलेल्या अनंता कौलकर हेअर एण्ड ब्युटी सलुनमध्ये २६ एप्रिल २०२४रोजी बोटाची शाही दाखवणारांची मोफत कटिंग करण्यात आली.

मतदान करा आणि लोकशाही बळकट करा असा संदेशही ते यामाध्यमातून देत आहे. यापूर्वीसुध्दा अनंता कौलकर यांनी नोटबंदी, सर्जिकल स्ट्राइकवेळी मोफत कटींगचा उपक्रम राबविला आहे. . मुळचे पातुर तालुक्यातील तांदळी येथील अनंता कौलकार यांनी मोठ्या हिमतीने अकोल्यात केशकर्तनाचा व्यवसाय सुरू केला.

केशकर्तन कलेत निपुण झालेल्या अंनता कडे महानगरातून मोठ्या प्रमाणात ग्राहक येतात .या क्षेत्रात राष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण घेतले आहे हे विशेष! ग्राम तांदळीत ग्रामस्वच्छता, जलसंधारण क्षेत्रात विशेष कार्य केले आहे.

अकोला शहरात कटिंग चे दर खूप जास्त आहेत.अशावेळी लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी अनंत कौलकार यांनी आगळावेगळा वेगळा उपक्रम राबवून अनंत हेअर स्टाईल या व्यावसायिक प्रतिष्ठानाने ये अपना स्टाईल है ये दाखवून आपलं राष्ट्रीय प्रेम व्यक्त केल

Santoshkumar Gawai
Santoshkumar Gawaihttp://mahavoicenews.com
मी संतोषकुमार गवई पत्रकारितेच्या क्षेत्रात गेल्या ३२वर्षापासून कार्यरत आहे.सकारात्मक विचार मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणतो म्हणून no negative only & only positive news यावरच माझा विश्वास आहे.संपुर्ण देशात सर्वप्रथम कारगील युध्दाचा 'आँखो देखा हाल'मांडता आला. शोध पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील चांगल्या घटना घडामोडी 'महाव्हाईस 'डिजिटल माध्यमातून समाजासमोर मांडणे हे माझ ध्येय आहे... संतोषकुमार गवई अकोला- 9689142973/9860699890
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: