सकल मराठा समाज खामगांवच्या वतीने आज प्रधानमंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना कर्णयंत्र व काळे चष्मे उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत पाठवुन अभिनव आंदोलन करण्यात आले…सकल मराठा समाज खामगांवच्या अमरण व साखळी उपोषणाचा पाचवा दिवस…
खामगांव – हेमंत जाधव
दिनांक 2 नोव्हेंबर 2023 वार गुरुवार रोजी सकल मराठा समाज खामगांवच्या अमरण व साखळी उपोषणाचा पाचवा दिवस उजाडला आहे प्रविण कदम, शिवा जाधव, शंकर खराडे, यांच्या अमरन उपोषणाचा पाचवा दिवस आहे व बाकी समाज बांधव हे आलटून पालटून साखळी उपोषण करीत आहेत सोबतच दररोज विविध प्रकारचे अभिनव आंदोलन करण्यात येत आहेत.
याच अनुषंगाने आज सकल मराठा समाज खामगांवच्या वतीने मराठा समाजाच्या आरक्षणा साठी तसेच मनोज दादा पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्या करिता व शासन प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज सकाळी ठीक 12 वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय येथ जाऊन उपविभागीय अधिकारी यांच्या वतीने तहसीलदार अतुल पाटोळे नायब तहसीलदार विजय पाटील यांच्या मार्फत प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री ह्यांना कर्णयंत्र व काळे चष्मे भेट म्हणुन पाठविण्यात आले.
मागील अनेक वर्षापासून मराठा समाजाच्या आरक्षनाच्या मागणी करिता सुरु असलेल्या लढ्या कडे कायम दुर्लक्ष करून वारंवार मराठा समाजातील गोर गरीब बांधवांची दिशाभूल हे प्रधानमंत्री मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री करीत आहेत त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात रस्त्यावर उतरून पोट तिडकीने मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या मराठा समाजाचा आवाज ऐकु येत नाही रस्त्या वर उतरलेल्या मराठा बांधवांच्या समस्या दिसुन येत नाहीत म्हणून या आंधळ्या बहिऱ्या संवेदन शून्य लोक प्रतिनिधींना सकल मराठा समाज खामगांव येथील मराठा बांधवांच्या वतीने कर्णयंत्र व काळे चष्मे पाठविण्यात आले आहे.
हे अभिनव आंदोलन सकल मराठा समाज खामगांवच्या वतीने करण्यात आले या आंदोलन प्रसंगी सकल मराठा समाज बांधव व माता भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.