अनंत कौलकर हेअर आणि ब्युटी युनिसेक्स सलून
अकोला – संतोषकुमार गवई
मतदार जनजागृती अभियानांतर्गत लोकशाही अधिक बळकट करण्याकरीता मतदानाची टक्केवारी अधिक वाढावी यासाठी अनंता कौलकार यांच्यावतीने बोटाची शाटी दाखवा आणि मोफत कटिंग करा हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नागरीकांमध्ये अधिकाधिक जनजागृती होवून त्यांनी मतदान करावे याकरीता रेल्वेस्थानक परीसरात रामदास पेठ परीसरात असलेल्या अनंता कौलकर हेअर ण्ड ब्युटी सलुनमध्ये २६ एप्रिल २०२४रोजी बोटाची शाही दाखवा आणि मोफत कटिंग करा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
या उपक्रमातून दिवसभर मतदान केलेल्या नागरीकांकरीता मोफत कटिंग करण्यात येणार आहे. मतदान करा आणि लोकशाही बळकट करा असा संदेशही ते यामाध्यमातून देत आहे. यापूर्वीसुध्दा अनंता कौलकर यांनी नोटबंदी, सर्जिकल स्ट्राइकवेळी मोफत कटींगचा उपक्रम राबविला आहे.
मुळचे पातुर तालुक्यातील तांदळी येथील अनंता कौलकार यांनी मोठ्या हिमतीने अकोल्यात केशकर्तनाचा व्यवसाय सुरू केला.केशकर्तन कलेत निपुण झालेल्या अंनता कडे महानगरातून मोठ्या प्रमाणात ग्राहक येतात. या क्षेत्रात राष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण घेतले आहे हे विशेष! ग्राम तांदळीत ग्रामस्वच्छता, जलसंधारण क्षेत्रात विशेष कार्य केले आहे