आकोट – संजय आठवले
कॉंग्रेस नेते मा. राहुल गांधी यांची “भारत जोडो यात्रा” कार्यक्रम सुरू असुन दि १७/११/२०२२ ते १८/११/२०२२ दरम्यांन सदर पदयात्रा अकोला जिल्हयामधुन जाणार आहे. सदर पदयात्रा दरम्यान कॉंग्रेस नेते मा. राहुल गांधी हे त्यांचे ताफ्यासह नांदेड येथुन निघून अकोला जिल्हयातील पातूर येथे पोहचतील. दि १७/११/२०२२ रोजी सकाळी ०६:३० वाजता शाह बाबु हायस्कुल, पातुर येथुन सदर पदयात्रा पून्हा सुरु होणार आहे.
सदर पदयात्रा त्याच दिवशी दूपारी ३:३० वा हिंगणा उजडे येथे पोहोचणार आहे. त्यानंतर दि. १८/११/२०२२ रोजी सकाळी ०६:३० वाजता जिल्हा परीषद प्राथमिक शाळा कुपटा येथून ही पदयात्रा पुढे बाळापुर येथून बुलढाणा जिल्हयामध्ये जळगाव जामोदकडे मार्गस्थ होणार आहे.
सदर पदयात्रेमध्ये राज्य भरातुन तसेच अकोला जिल्हयामधुन मान्यवर नेते, कार्यकर्ते तसेच इतर नागरीक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. सदर पदयात्रेमध्ये सहभागी सर्व मान्यवर नेते, कार्यकर्ते व नागरीक यांचे सुरक्षेच्या दृष्टीने तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहणे करीता तसेच मा. राहुल गांधी यांचे भारत जोडो यात्रेदरम्यान वाहतुकीचा अडथळा होवू नये व रहदारी नियंत्रणाचे दृष्टीने अकोला जिल्हयातील भारत जोडा यात्रा मार्गावरील ०१) मालेगाव पासुन मेडशी- पातुर- वाडेगाव- बाळापूर तसेच ०२) मालेगाव पासुन पातुर मार्गे अकोला वाशिम बायपास पर्यंत या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतुक दि १६/११/२०२२ चेदूपारी ३:०० वा. पासुन दि. १८/११/२०२२ चे सायं.५:०० वा. पर्यंत पुर्ण पणे बंद करण्यात आली आहे.
त्यामुळे या कालावधी दरम्यान या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतुक पर्यायी मार्गाने वळविण्यात येत आहे. भारत जोडो यात्रे दरम्यान बंद करण्यात आलेल्या व त्याकरिता पर्यायी म्हणून ठरविलेल्या मार्गांची माहिती पुढील प्रमाणे– १) मालेगाव- मेडशी- पातुर हा अकोला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१, दिनांक १६.१२.२२ चे दुपारी ३ वाजता पासून दिनांक १७.११.२२ चे सकाळी १० वाजेपर्यंत वाहतुकीस बंद करण्यात आलेला आहे. याकरिता पर्यायी मार्ग मालेगाव-शेलुबाजार- महान- बार्शीटाकळी वरून बाळापुरकडे असा निर्धारित करण्यातआला आहे. हा मार्ग सर्व वाहतुकीस खुला राहील.
२) मालेगाव कडून अकोला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ हा दिनांक १७.११.२२ चे पहाटे ५ वाजता पासून ते दिनांक १८.११.२२ चे सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व वाहतुकीस बंद करण्यात आलेला आहे. याकरिता पर्यायी मार्ग म्हणून मालेगाव कडून मेडशी- पातुर- चिखलगाव- कापशी- बाळापुर कडे हा मार्ग सर्व वाहतुकीस खुला राहील. अशी माहिती विलास पाटील निरीक्षक, शहर वाहतूक शाखा अकोला यांनी दिली आहे.