१२ जुलै २०२३ ला डॅशिंग उद्योग मंत्री मा. ना. उदयजी सामंत एक दिवसीय दौऱ्यावर CDCPR – २०२३ कार्यशाळा करिता, नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे आलेले होते.
हे नवीन उद्योग धोरण संपूर्ण महाराष्ट्र भर लागू होणार आहे व त्याची जनजागृती स्वतः उद्योग मंत्री करीत आहे. त्यासाठी त्यांचे ६ विभागांमध्ये कार्यशाळेचे आयोजन कार्यक्रम आहेत. विशेष बाब म्हणजे याची सुरवात त्यांनी अमरावती पासून केली.
नियोजन भवन ला सकाळी १०.०० वाजता कार्यक्रम होणार होता पण उद्योग मंत्री ९.०० लाच तिथे पोहचले व त्यांनी तिथे एक बैठक घेतली. बैठकीमध्ये एम.आय. डी.सी. इंडस्ट्रिअल असोसिएशन चे अध्यक्ष मा. किरणभाऊ पातुरकर, मा. आमदार प्रवीण पोटे पाटील, मा. आमदार रवीभाऊ राणा, मा. खासदार सौ. नवनीत राणा, जिल्हाधिकारी मॅडम, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बिपीन शर्मा, एम. आय. डी. सी. चे इतर अधिकारी, एम. आय. डी. सी. इंडस्ट्रीयल असोसीएशनचे पदाधिकारी सचिव श्री आशिष सावजी, उपाध्यक्ष श्री दिलीप अग्रवाल,
सहसचिव श्री प्रकाश राठी, सदस्य श्री संजय मित्तल व MIA चे मॅनेजर श्री नंदकिशोर पेटले, सहकर्मचारी संदीप कोरेवार,आदी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीमध्ये सगळ्या मुद्यांवर सविस्तर चर्चा त्यांनी केली. त्या नंतर कार्यकर्त्यांची भेट घेऊन लगेच १०.०० वाजता नियोजन भवन येथे कार्यशाळेच्या माध्यमातून या नवीन CDCPR – २०२३ नियमावली चे लाँचिंग अमरावती येथून करण्यात आले.
सर्वंत जास्त वेळा अमरावती येथे येणारे आणि उद्योग क्षेत्रासाठी धडाडीने काम करणारा उद्योग मंत्री महाराष्ट्राला लाभला आहे सामंत साहेबांच्या रूपाने. त्यामुळे उद्योग क्षेत्र अग्रणी असणाऱ्या महाराष्ट्राला उद्योग भरारी घेण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही.
स्वयंसिद्ध उद्योजकता विकास अभियान च्या संयोजिका प्रा. मोनिका उमक या सुद्धा बैठकीला हजर होत्या. महिला सक्षमीकरण व महिला उद्योजक घडविण्यासाठी गेल्या चार ते पाच वर्षापासून स्वयंसिद्ध उद्योजकता विकास अभियान करीत असलेल्या कार्याची माहिती त्यांनी मा. उद्योग मंत्र्यांना दिली.
स्वयंसिद्ध उद्योजकता विकास अभियान सुरु झाल्यापासून ते आज पर्यंत २५० चे वर उद्योजक या अभियाना मार्फत घडले आहे व त्यात ९० टक्के गरीब, विधवा, अनुसूचित जाती, जमाती, अपंग, बचतगट महिला यांचा समावेश आहे. प्रा. मोनिका उमक यांनी उद्योग मंत्र्यांना मागणी केली की, एम.आय.डी.सी. परिसरामध्ये महिला उद्योजकांसाठी छोटे छोटे प्लॉट एम.आय.डी.सी. ने उपलब्ध करून द्यावेत एवढी एक मागणी तातडीने पूर्ण करावी अशी विनंती प्रा. उमाक यांनी केली.
त्यांची ही विनंती मा. उद्योग मंत्र्यांनी मान्य करून एम.आय.डी.सी. च्या अधिकाऱ्यांना यावर तातडीने काम करण्यास सांगितले. यावेळी स्वयंसिद्ध च्या इतरही महिला सदस्या उद्योजिका प्रामुख्याने उपस्थित होत्या. यामध्ये रंजना बिडकर, स्मिता घटोळ, मंगला चांदूरकर, प्रतिभा तायडे, कीर्ती देशमुख, माला दळवी, शुभांगी मेहेर, सुवर्णा मालोकार इत्यादी महिला उद्योजिका उपस्थीत होत्या.
उद्योग मंत्री झाल्यापासून मा. उदय सामंत साहेबांचा हा चौथा ते पाचवा अमरावती दौरा आहे. प्रत्येक दौऱ्यामध्ये त्यांनी एम. आय. डी. सी. इंडस्ट्रीयल असोसीएशन चे अध्यक्ष मा. किरणभाऊ पातुरकर यांची भेट घेऊन व त्यांच्याशी चर्चा करून, उद्योग क्षेत्राला असणाऱ्या अडचणी, महामंडळाकडून होणारी कामाची दिरंगाई, एम. आय. डी. सी. परिसरात इन्फ्रास्ट्रक्चर ची कामे या सर्व बाबींवर प्रत्येक बैठकी मध्ये चर्चा केली.
कार्यशाळेमध्ये बोलत असताना मा. उद्योग मंत्र्यांनी किती तरी वेळा मा. किरणभाऊ पातुरकर यांचे नांव घेऊन सर्वांन समक्ष सांगत होते कि, किरणभाऊ तुम्ही सांगितलेल्या या या निवेदनावर आंम्ही हे निर्णय घेतलेत. किरण भाऊंचा वारंवारचा पाठपुरावा व जिद्द त्याचेच फळ म्हणजे खालील गोष्टींची पूर्तता होय.
१) नांदगांव पेठ एम. आय. डी. सी. टेक्सटाईल पार्क मधील रिसायकल पाण्याचे दर जे आधी १५४ रुपये होते. जे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक होते. किरणभाऊंच्या प्रयत्नाने व वारंवार केलेल्या पाठपुराव्यामुळे हे दर आता १५४ रुपये वरून १०४ रुपये करण्यात आले असे मा. उद्योग मंत्र्यांनी स्टेजवरून किरण भाऊंचे नांव घेऊन जाहीर केली.
२) महसूल सचिव यांच्याशी सखोल चर्चा करून एम. आय. डी. सी. करिता STAMP ड्युटी ही रेडी रेकनर दराने न घेता एम. आय. डी. सी. ने ठरविलेल्या दराने घेणार.
३) महिला सक्षमीकरण करण्याच्या हेतून महिला बचत गट, गृहउद्योग करणाऱ्या महिला, विधवा, अपंग, अनुसूचित जाती, जमाती च्या महिलांना एम. आय. डी. सी. मध्ये छोटे छोटे प्लॉट उपलब्ध करून देण्याचेही आदेश मा. उद्योग मंत्र्यांनी एम.आय.डी.सी. च्या अधिकाऱ्यांना दिले.
४) संपूर्ण भारतात फक्त ७ मेगा टेक्सटाईल पार्कला मंजुरू मिळाली आणि त्यामधला एक नांदगाव पेठ एम.आय.डी.सी. अमरावती येथे होऊ घातला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रित्या एक लक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. त्याकरिता १६ जुलै ला केंद्र सरकार सोबत MOU करणार असल्याची माहिती उद्योग मंत्र्यांनी याठिकाणी दिली व सप्टेंबर महिन्यात भूमिपूजनाला मा. पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांना अमरावतीला बोलावणार अशी ग्वाही त्यांनी दिली.
५) एम.आय.डी.सी. परिसरात होऊ घातलेल्या उद्योग भावनाचे लोकार्पण लवकरच होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले व त्यासाठी मा. ना. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते लोकार्पण लवकरच होईल असे उद्योग मंत्र्यांनी स्पष्ट केले.
आदी अनेक निर्णय जे मा. किरणभाऊ पातुरकर यांनी कित्येक वर्षापासून धरून ठेवले त्यांची आता पूर्तता होतांना दिसत आहे. अमरावतीचा औद्योगिक विकास होण्यापासून आता कोणीही रोखू शकणार नाही.
प्रा. मोनिका उमक
संयोजिका :- स्वयंसिद्ध उद्योजकता विकास अभियान