रामटेक – राजु कापसे
कविकुलगुरु इंस्टिटयूट ऑफ टेक्नॉलाजी ॲन्ड सायंस (किट्स) रामटेक मध्ये इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्ष्याचा विद्यार्थ्या करीता 23 ऑगस्टला इंडक्शन कम ओरिएंटेशन कार्यक्रमाचे आयोजन किट्सचा सिल्व्हर जुबली सभागृहात विद्यार्थी व पालक यांचा करिता करण्यात आले.
कार्यक्रमाची अध्यक्षता संस्था सचिव व्ही. श्रीनिवासराव यांनी केली. या वेळी प्रामुख्याने प्राचार्य डा. अविनाश श्रीखंडे, डीन व सिविल विभाग प्रमुख प्रा. डॉ. अनंत दाभाडे, इएसएच विभाग प्रमुख प्रा. डॉ. के. गजानन, विभाग प्रमुख, प्राध्यापक, पालक व विद्यार्थी मोठ्या संखेत उपस्थित होते.
संस्था सचिव व्ही. श्रीनिवासराव म्हणाले की विद्यार्थाना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या संस्था प्रयत्न करीत आहे. जेने करून जागतिक दर्जाचे विद्यार्थी घडतील. ते म्हणाले की विद्यार्थ्यानी रोल मॉडेल बनावे व समाजाची सेवा करावी.
प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे यांनी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून संस्थेच्या प्रगतीची माहिती दिली व करीअर विषयक मार्गदर्शन केले. संचालन प्रा. डॉ. योगीराज बकाले व प्रा. राशी श्रीगडीवार तर आभार डॉ. अनंत दाभाडे यांनी केले.