Indore BJP Office Fire : देशात भाजपा बहुमतात आली नसली तरी मात्र कार्यकर्ते NDA ची सरकार स्थापन झाल्याने मोठे उत्साही दिसत होते. तर अमरावतीत भाजपच्या अति उत्साही कार्यकर्त्यांनी चक्क निवडून आलेल्या कॉंग्रेसच्या उमेदवाराचे पोस्टर फाडल्याने वाद निर्माण झाला होता मात्र पोलिसांच्या पुढाकाराने तो मिटला सुद्धा. तर दुसरीकडे इंदौर मध्ये जल्लोष साजरा करीत असतांना भाजपच्या कार्यालयात आग लागण्याची घटना घडली आहे.
काल नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. देशभरात भाजप कार्यकर्त्यांनी उत्साहात साजरा केला. तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेऊन नरेंद्र मोदींनी इतिहास रचला असून, सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणारे ते दुसरे नेते ठरले आहेत. मात्र इंदूरमध्ये भाजप कार्यालयाला जल्लोष सुरू असतानाच कार्यालयात आग लागली.
इंदूरमधील भाजप कार्यालयाला आग लागली आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतल्यानंतरच देशभरातील समर्थकांनी जल्लोष साजरा केला. कोणी लाडू वाटत होते तर कोणी फटाके फोडत होते. इंदूरमधील भाजप कार्यालयासाठीही मोठ्या प्रमाणात फटाक्यांची मागणी करण्यात आली होती, परंतु काही कारणाने इमारतीला आग लागली.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रात्री 9.15 वाजता घडली. काही फटाक्यांमुळे इमारतीच्या छतावर पडलेले प्लायवूडचे तुकडे, जुना सोफा, टाकाऊ वस्तू आणि इतर फर्निचरला आग लागल्याचे सांगण्यात आले. यानंतर अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग आटोक्यात आणली.
या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये भाजप कार्यालयाच्या वरच्या मजल्यावरून ज्वाला निघताना दिसत आहेत. मात्र, कोणतीही मोठी हानी न होता आग आटोक्यात आणण्यात आली. रॉकेट छतावर पडल्याचे सांगण्यात आले, तेथे काही सामान ठेवण्यात आले होते. आग लागल्यानंतर तातडीने अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली.
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले
इंदूरचे एसीपी तुषार सिंह म्हणतात, “जेव्हा भाजप पक्षाचे कार्यकर्ते फटाके फोडत उत्सव साजरा करत होते, तेव्हा कार्यालयाच्या वरच्या मजल्यावर आग लागली आणि ती पसरली. अग्निशमन दलाच्या मदतीने आम्ही आग आटोक्यात आणली. सुदैवाने आगीवर वेळीच नियंत्रण मिळवले अन्यथा मोठी घटना घडू शकली असती.
#WATCH | Madhya Pradesh | Fire broke out at BJP office in Indore. Fire tenders reached the spot and controlled the fire. pic.twitter.com/0DHqrf5wrB
— ANI (@ANI) June 9, 2024