Indigo Flight : रविवारी रात्री उशिरा इंडिगोच्या फ्लाइटमध्ये एका प्रवाशाने विमानाला उशीर झाल्याने पायलटवर हल्ला केल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. वास्तविक, पायलट फ्लाइटला उशीर झाल्याची घोषणा करत होता. त्यामुळे प्रवासी इतका संतापला की त्याने पायलटला थप्पड मारली. प्रवाशाने दावा केला की तो फ्लाइट पकडण्यासाठी गेल्या 13 तासांपासून वाट पाहत होता. धुके आणि ट्रॅफिकमध्ये कसातरी तो विमानतळावर पोहोचला. तासन्तास प्रतीक्षा केल्यानंतर प्रवाशांना विमानात बसवण्यात आले. असे असूनही विमान उड्डाणास आणखी विलंब होणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ केवळ 27 सेकंदांचा आहे. हा व्हिडिओ दिल्ली विमानतळावरील असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये विमानातील पायलट विमानाला उशीर झाल्याची घोषणा करताना दिसत आहे. व्हिडिओ बनवणारी व्यक्ती मागच्या सीटवर बसलेली आहे, काही प्रवासी व्हिडिओमध्ये पायलटला ऐकतानाही दिसत आहेत. दरम्यान, फ्लाइटला आणखी विलंब झाल्याचे ऐकून एक प्रवासी इतका संतप्त होतो की तो धावत येऊन पायलटला चापट मारतो. ‘तुम्हाला विमान चालवायची असेल तर चालवा, नाहीतर गेट उघडा’, असे हा तरुण व्हिडिओमध्ये बोलताना ऐकू येत आहे.
हल्ला करणाऱ्या तरुणाने पिवळा स्वेट शर्ट परिधान केला होता. त्याचा चेहरा दिसत नाही. हल्ल्यानंतर घटनास्थळी उपस्थित एअर होस्टेसने आरडाओरडा सुरू केली. त्यांनी तरुणाला थांबवण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर पायलटने कसा तरी स्वत:ला वाचवले आणि कॉकपिटमध्ये पळून गेला. व्हिडिओमध्ये एअर होस्टेस तुम्ही हे कसे करू शकता असे विचारताना ऐकू येत आहे.
A passenger punched an Indigo capt in the aircraft as he was making delay announcement. The guy ran up from the last row and punched the new Capt who replaced the previous crew who crossed FDTL. Unbelievable ! @DGCAIndia @MoCA_GoI pic.twitter.com/SkdlpWbaDd
— Capt_Ck (@Capt_Ck) January 14, 2024
घटनेची माफी, तरुणांची टीका
सोशल मीडियावर, इंडिगोने या संपूर्ण घटनेबद्दल प्रवाशांकडे खेद व्यक्त केला आणि त्यांना असा अनुभव द्यायचा नाही असे सांगितले. त्याचवेळी सोशल मीडियावर लोक तरुणाच्या या कृतीवर टीका करत आहेत. त्याच्यावर पोलिसांनी कारवाई करावी, असे लोकांचे म्हणणे आहे.