Monday, December 23, 2024
Homeविविधउन्हाळ्याच्या सुट्टीत भारतीयांची कौटुंबिक व समूह प्रवासाला पसंती: कायक...

उन्हाळ्याच्या सुट्टीत भारतीयांची कौटुंबिक व समूह प्रवासाला पसंती: कायक…

नॉस्टेल्जिक गंतव्यांना पुन्हा भेट देण्यामध्ये सर्वाधिक रूची…

उन्हाळा जवळपास आला आहे आणि भारतीय पर्यटक त्याचा अधिकाधिक आनंद घेण्याची योजना आखत आहेत, जेथे सुट्टीच्या कालावधीसाठी फ्लाइट शोधामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. जगातील अग्रगण्य ट्रॅव्हल सर्च इंजिन कायक (KAYAK) ने केलेल्या भारतातील शहरी भागांमधील १२१७ भारतीयांच्या सर्वेक्षणाच्या आधारावर निदर्शनास आले की, उन्हाळी ऋतूसाठी कौटुंबिक व समूह प्रवासात वाढ झाली आहे. २०२२ च्या तुलनेतत कौटुंबिक फ्लाइट शोधामध्ये जवळपास २३० टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर त्यापैकी ८१ टक्‍के भारतीय त्यांच्या कुटुंबासोबत प्रवासावर जाण्याचे सांगत यंदा उन्हाळ्यामध्ये ट्रिपचे नियोजन करत आहेत.

या शोधातून निदर्शनास येते की गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाळ्यामध्ये प्रवासासाठी देशांतर्गत फ्लाइट शोधामध्ये जवळपास २०८ टक्क्यांची वाढ झाली आहे आणि लांबच्या आंतरराष्ट्रीय फ्लाइट शोधामध्ये देखील जवळपास १५८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

यंदा उन्हाळ्यामध्ये प्रवास करण्याचे नियोजन करत असलेल्यांपैकी एक-‍तृतीयांश भारतीयांवर नॉस्टेल्जियाचा प्रभाव पडला आहे आणि त्यांच्या पूर्वजांच्या ठिकाणांसह गतकाळात भेट दिलेल्या गंतव्यांकडे पुन्हा जात आहेत. रोचक बाब म्हणजे त्यांच्यासाठी नाविन्यता अजूनही महत्त्वाची आहे, जेथे जवळपास ५० टक्के भारतीयांचा पूर्वी भेट दिलेल्या गंतव्यांमध्ये नवीन आठवणी साठवण्याचा मनसुबा आहे, तर फक्त ३९ टक्के भारतीयांची गतकाळातील अनुभवांना उजाळा देण्याची इच्छा आहे.

कायकचे भारतातील कंट्री मॅनेजर तरूण तहिलियानी म्हणाले, ‘‘फ्लाइट व हॉटेल शोधामध्ये लक्षणीय वाढ होण्यासह भारतीय यंदा उन्हाळ्यामध्ये महामारीनंतर फॅमिली ट्रॅव्हल, अर्थपूर्ण अनुभव आणि पुन्हा त्याच उत्साहपूर्ण वातावरणात परतण्यास सज्ज आहेत. नॉस्टेल्जिया ट्रॅव्हल या ट्रेण्डला गती मिळत आहे, जेथे लोक विशेष स्थळांना पुन्हा भेट देत किंवा गंतव्यांचा शोध घेत जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत.’’

वयोगटासदंर्भात २५ ते ३४ वर्षे वयोगटातील व्यक्तींना त्यांच्या बालपणी किंवा किशोरवयीन काळात भेट दिलेल्या नॉस्टेल्जिक गंतव्यांना पुन्हा भेट देण्यामध्ये सर्वाधिक रूची आहे. कदाचित त्यांची त्यांच्या स्वत:च्या मुलांना तेथे घेऊन जाऊन त्या मौल्यवान आठवणी पुन्हा ताज्या करण्याची इच्छा आहे.

समर ट्रॅव्हलसाठी खर्च करण्यामध्ये वाढ: 

कायक ग्राहक संशोधनानुसार सर्वेक्षण करण्यात आलेले बहुतांश (८० टक्के) भारतीय समर हॉलिडेमेकर्स गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा त्यांच्या समर ट्रॅव्हलसाठी तितकाच किंवा त्याहून अधिक खर्च करण्याचे नियोजन करत आहेत.

वाढलेल्या फ्लाइट किंमतींचा भारतातील उत्सुक प्रवाशांसाठी अडथळा निर्माण करत आहेत असे वाटत नाही, जेथे किंमतीमध्ये वाढ झाली असताना देखील शोधांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे, जी रिटर्न इकॉनॉमी डॉमेस्टिक फ्लाइट्ससाठी जवळपास ४२ टक्के आहे आणि रिअर्न इकॉनॉमी इंटरनॅशनल फ्लाइट्ससाठी जवळपास १९ टक्के आहे.

समर ट्रॅव्हल सीझनदरम्यान रिटर्न इकॉनॉमी डॉमेस्टिक फ्लाइटचा सरासरी खर्च १३,१८८ रूपये आणि रिटर्न इकॉनॉमी लॉंग-हॉल इंटरनॅशनल फ्लाइटसाठी जवळपास ९३,४२८ रूपये आहे.

उन्हाळ्यामध्ये भारतीय पर्यटकांसाठी अव्‍वल गंतव्य: 

समर ट्रॅव्हलसाठी सर्वाधिक शोध घेण्यात आलेले आंतरराष्ट्रीय गंतव्य टोरोण्टो आहे, ज्यानंतर दुबई, लंडन व न्यूयॉर्क यांचा क्रमांक येतो. आशियामध्ये भारतीय पर्यटक बाली, बँकॉक, सिंगापूर व मालदीव अशा अत्यंत लोकप्रिय गंतव्यांचा शोध घेत आहेत. तसेच, नवी दिल्ली सर्वाधिक शोध घेण्यात आलेले देशांतर्गत गंतव्य होते, ज्यानंतर गोवा, श्रीनगर आणि अंदमान व निकोबार आयलँड्स यांचा क्रमांक होता.

देशभरातील कडाक्याचा उन्हाळा पाहता बहुतांश प्रतिसादक त्यांना थंडावा मिळेल अशा ठिकाणी प्रवास करण्याचे नियोजन करत आहेत. ६१ टक्के प्रतिसादकांना पर्वतांची ओढ आहे, तर ५१ टक्के प्रतिसादकांची समुद्रकिनारे असलेल्या गंतव्यांवर थंडाव्याचा आनंद घेण्याची इच्छा आहे.

कायक फ्लाइट सर्च डेटामधून निदर्शनास येते की, निवासाचा सरासरी नियोजित कालावधी लांब पल्ल्याच्या इंटरकॉन्टिनण्टल ट्रॅव्हलसाठी जवळपास ३५ दिवस, देशांतर्गत प्रवासासाठी जवळपास ६ दिवस आणि आशियामधील प्रवासासाठी अंदाजे ८ दिवस आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: