Sunday, December 22, 2024
Homeक्रिकेटIndian team Diwali | भारतीय संघाच्या खेळाडूंनी अशी साजरी केली दिवाळी...फोटो झाले...

Indian team Diwali | भारतीय संघाच्या खेळाडूंनी अशी साजरी केली दिवाळी…फोटो झाले व्हायरल…

Indian team Diwali – नेहमी निळ्या जर्शीत दिसणारी भारतीय टीम दिवाळीच्या निमित्य रंगीत पोशाखात दिसत आहे. कारण संघातील खेळाडूंनी बंगळुरूमध्ये मोठ्या थाटामाटात दिवाळी साजरी केली. सर्व खेळाडूंचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आज म्हणजेच दिवाळीच्या दिवशी भारताला वर्ल्ड कपमध्ये नेदरलँड्ससोबत शेवटचा साखळी सामना खेळायचा आहे.

त्याआधी संघातील खेळाडूंनी एकत्र दिवाळी साजरी केली. सर्व खेळाडू भारतीय एथनिक लूकमध्ये दिसले. कोहली पत्नी अनुष्कासोबत दिसला, तर रोहितनेही त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या खास दिवाळी सेलिब्रेशनमध्ये प्रशिक्षक राहुल द्रविडही सहभागी झाला होता. सोशल मीडियावर आलेले फोटो आणि व्हिडिओ पाहून चाहतेही खूप खुश आहेत. भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. उपांत्य फेरीत भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 15 नोव्हेंबर रोजी मुंबईत पहिला उपांत्य सामना होणार आहे. यानंतर 15 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसरा उपांत्य सामना होणार आहे.

फायनल 19 नोव्हेंबरला होणार आहे. 2019 च्या उपांत्य फेरीत भारताला न्यूझीलंडकडून पराभूत करून वर्ल्ड कपमधून बाहेर फेकले गेले होते. आता यावेळी भारतीय संघ 2019 चा बदला घेऊ शकेल का?

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: