Sunday, January 5, 2025
Homeराज्यइंडियन सोशल वेलफेअर सोसायटी अकोला या संस्थेने भारत सरकारच्या 'बाल विवाह मुक्त...

इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी अकोला या संस्थेने भारत सरकारच्या ‘बाल विवाह मुक्त भारत’ ला पाठिंबा जाहीर केला…

विलास सावळे

महिला बालविकास विभाग आणि अस्सेस टू जस्टीस प्रकल्प आय. एस. डब्ल्यू एस अकोला तसेच जिल्हा प्रशासन यांचा पुढाकार केंद्र सरकारने नवी दिल्ली येथे देशव्यापी ‘बाल विवाह मुक्त भारत’ मोहिम सुरु केल्याने महिला बालविकास विभाग आणि अस्सेस टू जस्टीस प्रकल्प आय. एस. डब्ल्यू. एस. अकोला तसेच जिल्हा प्रशासनाणे बालविवाहा विरोधात रॅलीचे, शपथविधी समारंभांचे आयोजन केले.

कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सदस्य महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे एड. संजय सेंगर , जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रंजना कंकाळ तसेच जिल्हा व तालुका प्रशासनचे अधिकारी यानी अकोला ‘जिल्हा बाल विवाह मुक्त करणार” असा संकल्प केला.

इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी अकोला संस्था ही जस्ट राइ‌ट्‌स फॉर चिल्ड्रन या देशभरातील मुलांच्या हक्कांच्या रक्षणासाठी काम करणाऱ्या 250 हुन अधिक एनजीओ भागीदारांच्या राष्ट्रीय युतीचा एक भाग आहे. विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे २७ नोहेंबर २०२४ रोजी केंद्र सरकारने बालविवाह विरोधी ‘बाल विवाह मुक्त भारत’ मोहिमेचा शुभारंभ केला असतानाच जिल्हा प्रशासनाने सु‌द्धा जिल्ह्यात इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी संस्थेच्या सहकार्याने रॅली शपथविधी समारंभ आयोजित केले.

जस्ट राइट्स फॉर चिल्ड्रन्स (जेआरसी) है देशभरातील 400 हुन अधिक जिल्ह्यामध्ये कार्यरत असलेल्या 250 पेक्षा जास्त बाल संरक्षण एनजीओ भागीदारांचे राष्ट्रीय नेटवर्क आहे आणि आधार बहुउद्देशीय संस्था ही त्या युतीचा भागीदार आहे
अकोला येथील वसंत देसाई स्टेडीयम येथे महिलांच्या नेतृत्वाखाली मशाल, स्कॅन्डल मार्च तसेच बालविवाह मुक्त भारत करण्यासाठी शपथ घेण्यात आली.

तसेच जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये ग्राम सभेचे आयोजन करून रॅली, आणि शपथ विधीचा कार्यक्रम घेण्यात आला. त्याचप्रमाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण , जिल्हा महिला बालविकास कार्यालय, सावित्रीबाई फुले कन्या शाळा , इत्यादी ठिकाणी सुधा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अकोल्यातील ४०० मुख्याधापकानी एकत्रित येवून बाल विवाह मुक्त भारत करण्याची शपथ घेतली. जिल्ह्यात कुठेही अशी घटना घडत असेल तर चाईल्ड लाईन १०९८ तसेच शासकीय यंत्रणेशी संपर्क साधावा असे आवाहन केले केले.

जिल्हाभरात शेकडो ग्रामस्थ, ग्रामपंचायती, सदस्य महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाचे एड.संजय सेंगर, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा महिला बालविकास अधिकारी रंजना कंकाळ, बाल कल्याण समिती, बाल न्याय मंडळ, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, बाल विवाह संरक्षण अधिकारी (सी.एम.पी.ओ), शिक्षणाधिकारी , गटशिक्षणाधिकारी, सुपरवायझर, अस्सेस तू जस्टीस प्रकल्प आय. एस. डब्ल्यू एस, चाईल्ड लाईन, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका / मदतनीस , शिक्षक, वन्स स्टॉप सेंटर, समाजिक संस्था, बालगृह, आणि महिला यांनी शपथ घेऊन कार्यक्रमात सहभाग घेतला.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: