Tuesday, November 5, 2024
Homeराज्यमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमार्फत खाते उघडण्याची...

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमार्फत खाते उघडण्याची सुविधा; केवळ ५ मिनीटात उघडले जाते खाते…

अमरावती – दुर्वास रोकडे

राज्य शासनाने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात प्रतिमाह 1 हजार 500 रुपयांचे अर्थसहाय्य जमा केले जाणार आहे. त्यासाठी महिलांचे बॅंक खाते असणे आवश्यक आहे. यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंकेने अवख्या पाच मिनीटात 200 रुपये शुल्क भरुन बॅंक खाते उखडले जाते. या सुविधाचा योजनेंतर्गत पात्र महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत 21 ते 65 वयोगटातील आणि कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 2 लाख 50 हजाराच्या आत असलेल्या महिलांना आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर योजनेचा लाभ दिला जाणार आहे. लाभाची रक्कम प्रतिमाह केवळ बॅक खात्याद्वारे अदा केली जाणार आहे. योजनेसाठी महिलांच्या नावांची नोंदणी जिल्हाभर मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. नोंदणी करतांना महिलांना बॅंक खात्याची झेरॅाक्स प्रत सोबत जोडणे आवश्यक आहे.

पोस्ट पेमेंट बॅंकेत अगदी काही वेळात आणि सहजपणे खाते उघडल्या जात असल्याने महिला हे खाते उघडण्याला पसंती देत आहे. भारतीय डाक विभागाच्या इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे जाळे संपुर्ण जिल्ह्यात अगदी गाव पातळीपर्यंत पसरलेले आहे. जिल्ह्यात सुमारे 454 पोस्ट ऑफिस आहे. त्यात 412 ग्रामीण भागात तर 42 शहरी भागात कार्यरत आहे. या सर्व पोस्ट कार्यालयातून इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे कार्य चालते. या बॅंकेत अवख्या पाच मिनीटात 200 रुपये शुल्क भरुन बॅंक खाते काढता येते.

जिल्ह्यातील सर्व पोस्टमनकडे डिपार्टमेंट मोबाईल आणि बायोमेट्रिक मशीन देण्यात आलेल्या आहेत. या मशिनच्या आधारे लाभार्थ्यांची अंगठा लावून पडताळणी केली जाते आणि खाते उघडून दिले जातात. खाते काढण्यासाठी पोस्ट पेमेंट्स बॅंकेत कोणत्याही प्रकारचे कागदपत्र द्यावे लागत नाही, फक्त आधार क्रमांक आणि मोबाईल सोबत असावा लागतो. जिल्ह्यात इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे जवळपास 2 लाख 50 हजारापेक्षा जास्त ग्राहक आहेत. त्यात आता 15 हजार लाडक्या बहिणींची भर पडली आहे.

खाते अन्य योजनेसाठीही उपयुक्त
इंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंकेचे खाते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेव्यतिरिक्त पीएम किसान योजना, रोजगार हमी योजना, प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना, ज्येष्ठ नागरिकांना निराधार योजना इत्यादीसाठी उपयुक्त आहे. लाडकी बहीण योजनेसाठी शासनाने देखील पोष्ट पेमेंट्स खात्याला मान्यता दिली असून महिलांनी खाते काढण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: