Monday, December 23, 2024
Homeराजकीयभारत ही महापुरुषांची पुण्यभूमी आहे…आमदार सुधीरदादा गाडगीळ

भारत ही महापुरुषांची पुण्यभूमी आहे…आमदार सुधीरदादा गाडगीळ

सांगली – ज्योती मोरे .

भगवान श्री परशुराम महात्मा श्री बसवेश्वर आणि छत्रपती श्री शिवाजी महाराज हे महानुभव भारतभूमीची अनमोल रत्ने आहेत या महापुरुषांनी आपापल्या क्षेत्रात केलेले कार्य उत्तुंग आहे. अत्यंत शूर आणि बलशाही असलेले ही दैवते अत्यंत क्षमाशील आणि करुणाकार होते या देशाच्या समाजाच्या हितासाठी आणि विकासासाठी त्यांनी आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण कामी लावला या महापुरुषांचे पुण्यस्मरण प्रत्येक भारतीयाला प्रेरणादायी आहे, असे विचार आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी मांडले.

जनसंपर्क कार्यालयात या महापुरुषांची प्रतिमा पूजन करताना ते बोलत होते. यावेळी जेष्ठ नेते प्रकाश तात्या बिर्जे, श्रीकांत तात्या शिंदे नगरसेवक संजय कुलकर्णी, विनायक सिंहासने, लिंगायत बोर्डिंगचे अध्यक्ष सुधीर सिंहासने, संचालक अशोक पाटील, योगेश कापसे, राहुल माळी, डॉ. अमोल कोळी, गणपती साळुंखे, प्रीती काळे, निखिल जाधव, सारंग साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: