Friday, November 22, 2024
Homeराज्यबिलोलीत झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठक...

बिलोलीत झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठक…

विद्यमान आमदारांसह बिलोलीच्या दोन प्रमुख माजी नगराध्यक्षांची अनुपस्थिती…

तिघेही भाजपाच्या वाटेवर..?

बिलोली – रत्नाकर जाधव

जे.महेश

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बिलोली येथील आनंद गार्डन मध्ये झालेल्या इंडिया आघाडीच्या कार्यकर्ता बैठक झाली.परंतु या बैठकीत बिलोली नगरपरिषदेचे काँग्रेसचे दोन माजी नगराध्यक्षांची बैठकीत अनुपस्थिती जाणवल्याने दोन ही जण भाजपाच्या वाटेवर आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

लोकसभेच्या निवडणुका जाहिर झाल्या असून

नांदेड लोकसभेच्या दोन्ही प्रमुख पक्षाच्या उमेदवारांची घोषणा झाली आहे.बिलोली येथे झालेल्या काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांनी काँग्रेस व महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांच्या पहिल्याच बैठकीत देगलूर बिलोली विधानसभेचे विद्यमान आ.जितेश अंतापुरकर व अशोकराव चव्हाण यांचे खंदे समर्थक असलेले एक व भास्करराव खतगावकर यांचे खंदे समर्थक असलेल्या एक अशा दोन नगराध्यक्षांची मात्र अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली.

यात विद्यमान आ.जितेश अंतापुरकर यांच्यासह नगरपरिषदेच्या निवडणुकीचा सातबारा आपल्याच नावाचा असल्याचा भास असणाऱ्या खा.अशोकराव चव्हाण यांचे खंदे समर्थक माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी व भास्करराव खतगावकरांचे खंदे समर्थक असलेले भीमराव जेठे या दोघांनाही कॉंग्रेच्या तालुकध्यक्षांनी भ्रमणध्वनी द्वारे निरोप देऊन ही अनुपस्थिती राहिल्याने हे आमदारांसह दोन्ही माजी नगराध्यक्ष भाजपाच्या वाटेवर आहेत का आशा प्रकारची चर्चा शहरात होत आहे.

एकेकाळी शहरातील काँग्रेसची धुरा सांभाळणारे हे दोन्ही धुरंदर अचानक बैठकीला अनुपस्थिती राहिल्याने त्यांच्या समर्थक मात्र यावेळी द्विधा मनस्थिती दिसत होती.विशेषतः खतगावकरांची खंदे समर्थक राहिलेले भीमराव जेठे यांनी २०१४ ला खतगावकर भाजपात गेल्या नंतर ही काँग्रेस मध्ये राहनेच पसंद केले होते.

परंतु २०२४ च्या निवडणुकीत त्यांची आजची अनुपस्थिती बैठकीच्या ठिकाणी चर्चेचा विषय ठरला होता.एकंदरीत आजच्या बैठकीत अशोकराव चव्हाण काँग्रेस मध्ये असतांनाचे बहुतांश समर्थक आज उपस्थित होते.परंतु खतगावकरांचा एक ही समर्थक बैठकीत उपस्थित नव्हता.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: