Monday, December 23, 2024
Homeराजकीयअमरावती पदवीधर मतदारसंघात खळबळ उडवून देणारी ऑडीओ क्लिप अपक्ष उमेदवार शरद झांबरे...

अमरावती पदवीधर मतदारसंघात खळबळ उडवून देणारी ऑडीओ क्लिप अपक्ष उमेदवार शरद झांबरे यांनी केली व्हायरल…

विधानपरिषद अमरावती पदवीधर मतदारसंघाची निवडणूक येत्या 30 तारखेला होणार असून त्याआधीच महाविकास आघाडीच्या उमेदवाराची एक ऑडीओ क्लिप अपक्ष उमेदवार शरद झांबरे यांनी व्हायरल केली असून सदर क्लिप उमेदवारी जाहीर होण्याच्या आधीची असल्याचे समजते, जेव्हा इच्छुक उमेदवार एकमेकांच्या संपर्कात होते आणि त्यामुळे त्यांच्यात वार्तालाभही झालेय…

ऑडिओ क्लिप सध्या अपक्ष उमेदवार शरद झांबरे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांच्यात झालेल्या वार्तालाभाची ऑडिओ क्लिप शरद झांबरे यांनी व्हायरल केलीय…या ऑडिओ क्लिपमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांनी काँग्रेस पक्षच बोगस असल्याचं म्हंटलंय तर नाना पटोले भाजपला एडजस्ट झाले असल्याचंही म्हंटलंय…

मात्र आता धीरज लिंगाडे यांनाच उमेदवारी देण्यात आलीय…अपक्ष उमेदवार शरद झांबरे यांनी ही ऑडिओ क्लिप एन मतदानाच्या दोन दिवसाधीच का व्हायरल केली यावरही आता शंका उपस्थित होत आहेय…

यावर प्रतिक्रिया घेण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांच्याशी संपर्क साधला असता, संपर्क होऊ शकला नाही…

टीप – सदर ऑडीओ क्लिपची महाव्हाईस न्यूज पुष्टी करत नाही…
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: