चंद्रपूर – नरेंद्र सोनारकर
बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात काँग्रेस-भाजप ची अपेक्षित आमने सामनेची लढाई त्रिरंगी लढतीत परवर्तीत होत असून,डॉ. अभिलाषा गावातूरे यांच्या झंजावाती प्रचार यंत्रणे मुळे प्रस्थापित पक्षाला घाम फुटला आहे.
बल्लारपूर विधानसभा-72 मधून राज्याचे तत्कालीन मंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या 15 वर्षाच्या अभेद्य किल्ल्यात राष्ट्रीय काँग्रेस ने सिडीसीसी बँकेचे अध्यक्ष संतोषसींग रावत यांना उमेदवारी दिली.त्यामुळे मुनगंटीवार रावत यांची आमने सामने लढत होईल अशी शक्यता वर्तवल्या जात होती.
मात्र राष्ट्रीय काँग्रेसने उमेदवारी नाकारलेल्या डॉ. अभिलाषा गवतूरे यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केल्याने या विधानसभा क्षेत्रात चुरस निर्माण झाली आहे.डॉ. अभिलाषा गावतुरे यांचा झंजावाती प्रचार आणी जनसंपर्क,त्यांना मिळणारा प्रतिसात बघता मतांच्या भागाकारात काँग्रेस-भाजप या पैकी कुणाचे गणित बिघडेल हे सद्यातरी सांगता येत नाही.दरम्यान अपक्ष उमेदवारी दाखल करूनही त्यांनी दोन्ही प्रस्थापित राष्ट्रीय पक्षांना घाम फोडला आहे,हे विशेष