Tuesday, November 5, 2024
Homeराज्यस्वातंत्र्य दिनाचा मुख्य ध्वजारोहण सोहळा; पूर्वतयारी आढावा, कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समन्वयाने काम करावे...

स्वातंत्र्य दिनाचा मुख्य ध्वजारोहण सोहळा; पूर्वतयारी आढावा, कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समन्वयाने काम करावे – निवासी उपजिल्हाधिकारी…

अमरावती – दुर्वास रोकडे

भारतीय स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय समारंभ दि. 15 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9.05 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय येथे होणार आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी आज येथे दिले.

भारतीय स्वातंत्र्याचा वर्धापन दिनाचा मुख्य ध्वजारोहण सोहळाच्या पूर्वतयारी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त माया केदार, जिल्हा क्रीडा अधिकार गणेश जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे तुषार काळे, मनपाचे डॉ. अजय जाधव, पोलीस निरिक्षक प्रविण बांगडे, श्रीधर गुलमुंढरे, भुषण पुसतकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

श्री. भटकर म्हणाले की, नागरिकांना मुख्य शासकीय समारंभात सहभागी होता यावे यासाठी दि. 15 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 8.35 ते 9.35 यावेळेत इतर कार्यालय, संस्थांनी ध्वजारोहण किंवा शासकीय अथवा निमशासकीय समारंभ आयोजित करु नये.असे समारंभ सकाळी 8.35 च्या पूर्वी किंवा सकाळी 9.35 च्या नंतर आयोजित करावे. कार्यक्रमात राष्ट्रगीतानंतर ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे राष्ट्रगीत बँड पथकाव्दारे सादर करण्यात येईल.

महानगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी संयुक्तपणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोरील साफसफाई आपल्या विभागामार्फत करावी. तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, लि. अमरावती यांनी कार्यक्रमस्थळी वीज पुरवठा खंडीत होणार नाही, याची दक्षता घ्यावी. कार्यक्रमाच्यावेळी ध्वजाला मानवंदना देण्यासाठी पोलीस पथक, बँड पथक तसेच ध्वजारोहणाची रंगीत तालीम घ्यावी. राष्ट्रध्वज सूर्यास्तास उतरवला जाईल, याची दक्षता समितीने घ्यावी. तसेच कार्यक्रमस्थळी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलीस विभागाने व्यवस्था करावी.

स्वातंत्र्यदिनाचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपल्यानंतर सर्व विभागीय कार्यालय, शिक्षण संस्था, महाविद्यालय, शाळा तसेच सेवाभावी संस्था, क्रीडा मंडळ यांनी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम करावा. त्यासाठी लागणारी रोपे सामाजिक वनीकरण विभाग, अमरावती यांनी पुरवावी. तसेच अतिथी व उपस्थितांची बैठक व्यवस्था, आवश्यक स्वयंसेवक, ध्वनीयंत्रणा आदी व्यवस्था काटेकोर असावी, अशा सूचना श्री. भटकर यांनी यावेळी दिल्या.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: