Sunday, December 22, 2024
Homeराज्यसुरज फाउंडेशन ग्रुप ऑफ नव कृष्णा व्हॅली स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मार्फत...

सुरज फाउंडेशन ग्रुप ऑफ नव कृष्णा व्हॅली स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मार्फत स्वातंत्र्य दिन साजरा…

सांगली – ज्योती मोरे

सुरज फाउंडेशन ग्रुप ऑफ नव कृष्णा व्हॅली स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मार्फत 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर यशवंत तोरव चेअरमन नव कृष्णा व्हॅली स्कूल कमिटी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.प्रवीणजी लुंकड, मा. एन जी कामत, सचिव सुरज फाउंडेशन मा. अरिजीत गोस्वाल डीजे स्पोर्ट्स दिल्ली नोएडा सौ. संगीता पागनीस, प्राचार्य व संचालिका सुरज फाउंडेशन मा. अधिकराव पवार, प्राचार्य नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम मा .संतोष बैरागी,

इन्चार्ज नव कृष्णा व्हॅली गुरुकुल विभाग मा. श्रीशैल मोटगी,अकाउंट विभाग प्रमुख विनायक जोशी, इन्चार्ज सुरज स्पोर्ट्स अकॅडमी अश्विनी माने आयआयटी व मेडिकल अकॅडमी गीतांजली देशमुख पाटील एच आर सुरज फाउंडेशन मा अब्दुल देवर्षी ए सीअँड एबीसी सेंटर मा. राजेंद्र पाचोरे प्रमुख एन क्रिश प्रा ली हे उपस्थित होते.

माननीय डॉक्टर यशवंत तोरव यांनी यांच्या भाषणामध्ये प्रत्येकाने देश सेवा ही केलीच पाहिजे. देशाचा अभिमान जोपासला पाहिजे, असे सांगितले त्याचबरोबर माननीय प्रवीणजी लुंकड यांनी यांच्या भाषणामध्ये प्रत्येकाने राष्ट्रीय हित जपले पाहिजे असे सांगत आज नव कृष्णा व्हॅली स्कूल येथे कृष्णा व्हॅली डीजे फुटबॉल स्पोर्ट्स अकॅडमी स्थापना करण्यात आली.

त्यामध्ये बाहेरील देशातील प्रशिक्षक कांच्यामार्फत नव कृष्णा व्हॅली स्कूल येथे फुटबॉल खेळाडूंना ट्रेनिंग देण्यात येणार आहे अशी घोषणा केली, तर खेळाडूंची निवास व भोजन व्यवस्थेसह शिक्षणाची सोय सुद्धा करण्यात आली आहे भारतातील सर्व चांगले खेळाडू नव कृष्णा व्हॅली स्कूलमध्ये तयार होतील अशा पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे .तसेच दिनांक 13 ऑगस्ट रोजी राम मंदिर ते पोलीस मुख्यालय पर्यंत अमृत महोत्सव रॅली काढण्यात आली होती.

प्रत्येकाच्या हाती ध्वज व राष्ट्रीय नेत्यांचे वेशभूषांतर करून घोषणाच्या जल्लोषात रॅली काढण्यात आली होती. आजचा 15 ऑगस्ट चा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी स्वागत व प्रस्ताविक संगीता पागनीस,प्राचार्य व संचालिका सुरज फाउंडेशन यांनी केले त्याचबरोबर आभार सौ सुनीता पाटील व ज्ञानदेव कांबळे यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: