मलकापूर स्थित भारत डिफेन्स अकॅडमीमध्ये स्वतंत्रता दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. 78 वा स्वतंत्र दिनाचा मुख्य समारोह डिफेन्स अकॅडमीच्या प्रांगणात घेण्यात आला. यावेळी भारत डिफेन्स अकॅडमीच्या पहिल्या तुकडीच्या विद्यार्थ्यांनी प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली.
भारत डिफेन्स अकॅडमीचा 15 ऑगस्टचा झेंडावंदन समारोह सामाजिक न्याय संरक्षण संघाचे अध्यक्ष तथा मानव अधिकार वृत्ताचे संपादक विजयकुमार गडलिंगे यांच्या हस्ते पार पडला. पहिल्या तुकड्यातील 30 विद्यार्थ्यांनी प्रमुख पाहुण्यांसमोर अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने परेट संचलन केले. या परेट संचलनाचे नेतृत्व मयंक कांबळे या विद्यार्थ्यांने केले.
यावेळी यु सी एन टेलिव्हिजन नेटवर्क अकोला न्यूज युनिट हेड, मधु कसबे, भारत डिफेन्स अकॅडमीचे संस्थापक कुणाल डीवरे आणि प्रमोद डीवरे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. याप्रसंगी देशासाठी हुतात्मा झालेल्या सैनिकांचा, वीर माता, वीर पत्नी, वीर पिता कुटुंबियांचा आणि स्वातंत्र्यता संग्राम सैनिकांचे पाहुण्यांनी स्मरण करून गुणगौरव केला. भारत डिफेन्स अकॅडमी मध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या काही विद्यार्थ्यांचे पालक आणि परिसरातील प्रतिष्ठित नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
औरंगाबाद नंतर अकोल्यात सुरू झालेली सैनिकी प्रशिक्षण अकॅडमी अमरावती विभागातील ही पहिलीच अकॅडमी असल्याचे संस्थापक कुणाल डीवरे यांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रमोद डीवरे, कुणाल, सायली, मार्शल आर्ट श्री सोनवणे, अल्पना गडलिंगे, सार्थक गडलिंगे, दत्ता लबडे, श्रीकांत लांडे, गाडेकर, चव्हाण, राठोड, अंकुश मानकर आणि शिवणी वानखडे यांनी परिश्रम घेतले.