राष्ट्र विकास सेना पक्ष,डेमॉक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया, मातंग सेवा संघ,दलित महासंघ व सर्व बहुजन पक्ष संघटना च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोनी तील प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन.
सांगली – ज्योती मोरे
आज दिनांक 3 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजलेपासून मिरज तालुक्यातील मौजे सोनी गावातील प्रकल्पग्रस मातंग समाजातील शेतकरी कुटुंबांना न्याय देण्यासाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यलयासमोर राष्ट्र विकास सेनेचे युवक प्रदेश अध्यक्ष प्रशांतभाऊ सदामते यांच्या नेतृत्वाखाली बैलजोडी,बैलगाडी, नांगर,कुरी, कोळपे,शेळ्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धान्य टाकून पेरणी करून लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले.
मौजे सोनी तालुका मिरज येथील मागासवर्गीय मातंग समाजातील शेतकऱ्यांच्या जमिनी-शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड कोकळे साईट सोनी चे चेअरमन शैलजा प्रकाश पाटील यांचे नावे प्रकल्प होण्यासाठी कवडीमोल किमतीत खरेदी केल्या,परंतु गेली 25 वर्षांपासून तिथे प्रकल्प न उभा करता त्या जमिनींच्यावर विविध बँकेचे 3.25 कोटी रुपयांची कर्जे उचलून जमिनी बँकेच्या घशात घातल्या तसेच शेतकऱ्यांना कारखान्यात काम देण्याचे लेखी पत्र देण्यात आली होती,
परंतु अद्याप त्या ठिकाणी कारखाना उभाच राहिला नसल्याने शेतकऱ्यांनी प्रकल्पासाठी जमिनी दिल्या होत्या पण प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांची फसवणूक झाली ,चार दिवसांपूर्वी कारखाना परिसरात मातंग समाजातील शेतकरी आमच्या घेतलेल्या जमिनींचे व कामाचे काय झालं हे विचारण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी विशाल पाटील यांनी पाठवेलेल्या गुंडांनी व व्यवस्थापन करणाऱ्या कर्मचारी अधिकारी यांनी जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळ कारखाना व्यवस्थापनावर नऊ जनांच्यावर जात प्रतिबंधक कायद्यानुसार मंगळवारी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे,
परंतु शेतकऱ्यांची जमीन दंडुकशाही पध्दतीने बळकावून बँकेच्या घशात घालून फसवणूक झाल्याने व कारखान्यात नोकरीचे खोटे आश्वासन दिल्याने मुख्य आरोपी कारखाना संचालक शैलजा प्रकाश पाटील व त्या जांनींच्यावर बँकेचा बोजा असताना कारखान्याचा कोणताही संबंध नसताना कारखाना परिसरात गुंड पाठवून मागासवर्गीय मातंग समाजातील कुटुंबांच्यावर दहशतिचे वातावरण पसरवून धमकी दिल्याने या दोघांनाही मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद झलेल्या अट्रॉसिटी गुन्ह्यात मुख्य आरोपी करण्यात यावे तसेच वेळेत प्रकल्प पूर्ण,
झाल्याने मातंग समाजातील शेतकऱ्यांच्या जमिनीच्या खरेदी रद्द करून शेतकऱ्यांना जमिनी परत देण्यात याव्यात व 25 वर्षापासून आत्तापर्यंत बेरोजगार व भूमिहीन झालेल्या मातंग समाजातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी व इतर मागण्यांसाठी सोनी गावातील मातंग समाजातील प्रकल्पग्रस्त शेतकरी कटुंबांना बैलगाडी बैलजोडी नांगर,
कुरी कोळपणी व शेळ्या बकरी घेऊन सांगली जिल्हाधिकारी कार्यलयासमोर पेरणी करून विशाल पाटलांच्या व कारखान्याच्या विरोधात घोषणा देत लक्षवेधी धरणे आंदोलनाचा आज तिसरा दिवस होता यावेळी राष्ट्र विकास सेना पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व विविध पक्ष संघटनांचे कार्यकर्ते व मातंग समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.