अहेरी राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी व कर्मचारी समायोजन कृती समिती शाखा अहेरीच्यावतीने तालुका आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन सुरू झाले असून या आंदोलनात मोठ्या प्रमाणात अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले आहेत.
मागील अनेक वर्षापासून अतिशय तूटपुंजा मानधनावर खेडोपाडी व शहरात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी आरोग्य अधिकारी व कर्मचारी आपल्या जीवाची राख रांगोळी करत आरोग्य सेवा देत आहेत, नुकत्याच कोरोना महामारी आपल्या कुटुंबाची परवा न करता देवदुताता सारखे कोविड महामारीवर मात करण्यासाठी रात्रंदिवस आरोग्य सेवा दिलेली आहे परंतु महाराष्ट्र शासन या कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्यास असमर्थ ठरत आहे परिणामी महाराष्ट्रातील तमाम कंत्राटी आरोग्य कर्मचारी रस्त्यावर उतरून टाहो फोडीत आहेत, दरम्यान समायोजनेच्या मागणीसाठी तालुका अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू केले आहे.