IND vs SL : भारत आणि श्रीलंका यांच्यात २७ जुलैपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी गुरुवारी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. सूर्यकुमार यादवला या संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. त्याचवेळी रोहित शर्मा वनडे संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. या दौऱ्यात विराट कोहलीही एकदिवसीय मालिकेचा भाग असणार आहे. या दौऱ्यावरील दोन्ही मालिकेसाठी शुभमन गिलला उपकर्णधारपद देण्यात आले आहे.
T-20 विश्वचषक चॅम्पियन संघातील तीन खेळाडू विराट कोहली, रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांनी निवृत्ती घेतली आहे. याशिवाय बुमराहलाही या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. त्याचबरोबर कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांनाही टी-२० संघात स्थान मिळालेले नाही. चहलला वनडे संघातही स्थान मिळालेले नाही. तर, कुलदीप यादव वनडे संघाचा भाग असेल.
भारताच्या श्रीलंका दौऱ्याचा संपूर्ण कार्यक्रम
भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला 27 जुलैपासून सुरुवात होणार आहे. भारतीय संघ 20 तारखेनंतर या दौऱ्यासाठी रवाना होऊ शकतो. मात्र, याबाबत बीसीसीआयकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दुसरा सामना 28 रोजी तर तिसरा सामना 30 जुलै रोजी होणार आहे. त्याच वेळी, एकदिवसीय मालिका 2 ऑगस्टपासून सुरू होईल, ज्याचा दुसरा आणि तिसरा सामना अनुक्रमे 4 आणि 7 ऑगस्ट रोजी खेळवला जाईल.
T20 संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल , वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद, मोहम्मद सिराज.
एकदिवसीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा.