Saturday, November 23, 2024
HomeMarathi News TodayIND vs SA | रोहित शर्मा आज बाबर आझमच्या विश्वविक्रमाशी बरोबरी करणार?…

IND vs SA | रोहित शर्मा आज बाबर आझमच्या विश्वविक्रमाशी बरोबरी करणार?…

T20 विश्वचषक 2022 मध्ये भारताला आज पर्थमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा सामना खेळायचा आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माकडे बाबर आझमच्या विश्वविक्रमाची बरोबरी करण्याची मोठी संधी आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आज दक्षिण आफ्रिकेला रोखण्यात यश मिळवले तर कर्णधार म्हणून एका वर्षात सर्वाधिक सामना जिंकणाऱ्यांच्या यादीत रोहित शर्मा बाबर आझमची बरोबरी करेल. बाबर आझमने 2021 मध्ये हा विक्रम केला होता.

T20 विश्वचषक सुरू होण्यापूर्वी रोहित शर्माने यावर्षी 17 विजय मिळवले होते. स्पर्धेदरम्यान भारताने प्रथम पाकिस्तानला नमवले आणि नंतर नेदरलँडला पायदळी तुडवले. या दोन विजयांसह रोहितने 2022 मध्ये 19 विजय मिळवले आहेत. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने आज दक्षिण आफ्रिकेचा पराभव केल्यास बाबर आझमच्या २० विजयांची बरोबरी होईल. या यादीतील तिसरे नाव भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2016 मध्ये 15 सामने जिंकले.

याशिवाय रोहित शर्माला आज T20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल (965) ला मागे टाकण्याची संधी आहे. रोहितने वर्ल्ड कपमध्ये नेदरलँड्सविरुद्ध अर्धशतक झळकावल्यानंतर 904 धावा केल्या आहेत. जर रोहितने आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 62 धावा केल्या तर तो T20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा तिसरा खेळाडू बनेल. या यादीत पुढे विराट कोहली आणि महेला जयवर्धने आहेत.

कोहलीच्या T20 विश्वचषकात 989 धावा आहेत, तर महेला जयवर्धने 1016 धावांसह अव्वल स्थानावर आहे. आजच्या सामन्यात विराटलाही मोठी संधी आहे. आज 11 धावा केल्यानंतर कोहली 1000 धावांचा टप्पा गाठेल, तर 28 धावा करताच तो जयवर्धनेचा विक्रम मोडणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: