IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना आजपासून खेळवला जात आहे. केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. सेंच्युरियनमधील पहिली कसोटी जिंकून दक्षिण आफ्रिकेने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाला दुसरी कसोटी जिंकून मालिका बरोबरीत सोडवायची आहे. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 55 धावा केल्या आहेत.
दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 55 धावांवर आटोपला. पहिल्या सामन्यात सामान्य दिसणाऱ्या भारतीय गोलंदाजांनी या सामन्यात अप्रतिम कामगिरी केली. मोहम्मद सिराजने सर्वाधिक सहा बळी घेतले. जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. दक्षिण आफ्रिकेचे दोनच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. काइल व्हर्नने 15 आणि डेव्हिड बेडिंगहॅमने 12 धावांचे योगदान दिले. याशिवाय एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. एडन मार्कराम (१२ धावा), डीन एल्गर (१८ धावा), टोनी डीजॉर्ज (१६ धावा), ट्रिस्टन स्टब्स (१६ धावा), मार्को जॅनसेन (0 धावा), केशव महाराज (१ धावा), कागिसो रबाडा (१ धावा), नांद्रे बर्जर बाद झाला (4 धावा).
6 Fer 🚨: for Mohammad Siraj , bundled all SA for 55 runs with his 9-3-15-6 ✨
— RCB Xtra. (@Rcb_Xtra) January 3, 2024
Different beast when on song….!!!#INDvsSApic.twitter.com/2T4FwVP7XW