Monday, December 30, 2024
HomeMarathi News TodayIND vs SA । भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या T20 सामन्यावर संकटाचे...

IND vs SA । भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या T20 सामन्यावर संकटाचे सावट…कारण जाणून घ्या…

IND vs SA T20 – भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना 28 सप्टेंबर रोजी तिरुअनंतपुरममधील कर्यवट्टम येथील ग्रीनफील्ड स्टेडियमवर खेळवला जाणार आहे आणि हे स्टेडियम या आंतरराष्ट्रीय सामन्याचे आयोजन करण्यासाठी सज्ज आहे. यापूर्वी केरळ स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड लिमिटेड (KSEBL) ने स्टेडियम प्रशासनाला मोठा धक्का दिला आहे. 2.36 कोटींची थकबाकी न भरल्याने वीज मंडळाने वीजपुरवठा बंद केला आहे.

गेल्या तीन वर्षांपासून ग्रीनफिल्ड स्टेडियमचे वीज बिल भरलेले नाही. यामुळे केएसईबीएलने थकबाकी भरण्याची मागणी केली आहे. यातच दुसरी भर, केरळ जल प्राधिकरणाने थकबाकी न भरल्यास पाण्याच्या लाईन्स तोडण्याची धमकी दिली आहे. द न्यू इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, सामन्याच्या 10 दिवस आधी ग्रीनफील्ड स्टेडियमचा विद्युत पुरवठा बंद करण्यात आला आहे.

मंगळवारी, केएसईबीएलच्या काळकुट्टम विभागीय कार्यालयाने करवट्टम ग्रीनफिल्ड स्टेडियममधील थकबाकी न भरल्यामुळे फ्यूज खेचला. गेल्या काही दिवसांपासून ग्रीनफिल्ड स्टेडियममध्ये भाड्याने घेतलेल्या जनरेटरच्या सहाय्याने देखभाल दुरुस्तीचे काम सुरू आहे. 28 सप्टेंबर रोजी सामनापूर्व सुरक्षा मूल्यांकन बैठकही भाड्याने घेतलेल्या जनरेटरच्या मदतीने आयोजित करण्यात आली होती. अनेक वेळा ताकीद देऊनही थकबाकी भरली नसल्याचे वीज मंडळाचे म्हणणे आहे.

राज्य सरकारच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “ग्रीनफिल्ड स्टेडियमसाठी केरळ स्पोर्ट्स फॅसिलिटी लिमिटेड जबाबदार आहे, ज्याने गेल्या तीन वर्षांत वीज आणि पाण्याचे बिल भरलेले नाही.

त्याचबरोबर केरळ क्रिकेट असोसिएशनने केएसएफएलला जबाबदार धरले आहे. KSFL कडे तिरुअनंतपुरम कॉर्पोरेशनचे 2.85 कोटी रुपये कर थकीत आहेत. आता 28 सप्टेंबरच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यावर परिणाम होऊ नये म्हणून हे संकट सोडवण्यासाठी राज्य सरकारवर दबाव वाढत आहे. या क्रिकेट सामन्याच्या तिकिटांची विक्री सोमवारपासून सुरू होण्याची शक्यता आहे. केरळ क्रिकेट असोसिएशनने राज्य सरकारकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: