Sunday, December 22, 2024
HomeT20 World CupIND vs PAK | भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानला धक्का…सरावा दरम्यान 'या' खेळाडूच्या डोक्याला...

IND vs PAK | भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानला धक्का…सरावा दरम्यान ‘या’ खेळाडूच्या डोक्याला लागला चेंडू…जखमी खेळाडू रुग्णालयात…

IND vs PAK : टी-20 विश्वचषकात भारत विरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे. सरावाच्या वेळी फलंदाज शान मसूद जखमी झाला. त्याला रुग्णालयात नेण्यात आले आहे. सरावाच्या वेळी मसूदच्या डोक्याला मार लागला. चेंडू आदळल्यानंतर तो जमिनीवर पडला. यानंतर मसूदला स्कॅनसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दुखापतीनंतर मसूद जमिनीवर पडून होता. फिजिओ आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. मसूद मेलबर्न क्रिकेट मैदानावर सराव करत होता. फिरकीपटू मोहम्मद नवाजचा उसळलेला चेंडू त्याच्या डोक्याच्या उजव्या बाजूला आदळल्याचे बोलले जात आहे. स्कॅन केल्यानंतरच दुखापत किती गंभीर आहे, हे समजेल.

T20 विश्वचषकात दोन्ही संघ वर्षभरानंतर आमनेसामने येणार आहेत. दुबईत गेल्या वेळी दोन्ही संघ आमनेसामने आले होते, तेव्हा पाकिस्तानने १० विकेट्सने विजय मिळवला होता. विश्वचषकात भारताला पहिल्यांदाच पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला. त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी तो मेलबर्नला उतरणार आहे.

दोन संघ पुढीलप्रमाणे आहेत.
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.

स्टँडबाय खेळाडू: श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर.

पाकिस्तानः बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद, फखर जाम.

राखीव: मोहम्मद हरीस, उस्मान कादिर आणि शाहनवाज दहनी.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: