Sunday, December 22, 2024
HomeT20 World CupIND vs NED T20 | भारताने नेदरलँड्ससमोर ठेवले १८० धावांचे लक्ष्य…सुर्यकुमार यादवची...

IND vs NED T20 | भारताने नेदरलँड्ससमोर ठेवले १८० धावांचे लक्ष्य…सुर्यकुमार यादवची तुफान पारी…

IND vs NED T20 : T20WorldCup भारतीय संघ आज T20 विश्वचषकातील दुसरा सामना खेळत आहे. सिडनीत गुरुवारी त्यांचा सामना नेदरलँडशी सुरु आहे. दोन्ही संघ टी-20 मध्ये प्रथमच आमनेसामने येत आहेत. भारताने हा सामना जिंकल्यास त्याचे चार गुण होतील. उपांत्य फेरी गाठण्याची शक्यता आणखी वाढेल. त्याचबरोबर नेदरलँड्सला सलग दुसरा पराभव टाळायचा प्रयत्न करणार आहे. गेल्या सामन्यात त्याला बांगलादेशकडून पराभव पत्करावा लागला होता.

भारताने नेदरलँडसमोर 180 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 20 षटकांत 2 गडी गमावून 179 धावा केल्या. विराट कोहली 44 चेंडूत 62 धावा करून नाबाद राहिला आणि सूर्यकुमार यादवने 25 चेंडूत 51 धावा केल्या. कोहलीने आपल्या खेळीत तीन चौकार आणि दोन षटकार मारले. तर सूर्यकुमारने सात चौकार आणि एक षटकार लगावला. दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 48 चेंडूत 95 धावांची भागीदारी झाली.

शेवटच्या पाच षटकांत भारताने एकही विकेट न गमावता 65 धावा केल्या. कोहली-सूर्याशिवाय रोहित शर्माने 39 चेंडूत 53 धावा केल्या. रोहितने आपल्या खेळीत चार चौकार आणि तीन षटकार मारले. तर केएल राहुल सलग दुसऱ्या सामन्यात अपयशी ठरला. त्याला 12 चेंडूत नऊ धावा करता आल्या. पाकिस्तानविरुद्धच्या गेल्या सामन्यात राहुलला केवळ चार धावा करता आल्या होत्या.

कोहलीने T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 35 वे शतक आणि या विश्वचषकात सलग दुसरे अर्धशतक झळकावले. यापूर्वी त्याने पाकिस्तानविरुद्ध 82 धावांची नाबाद खेळी खेळली होती. त्याचवेळी रोहितने टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 29 वे अर्धशतक झळकावले. राहुल 11 धावांवर बाद झाल्यानंतर कोहली आणि रोहितने 56 चेंडूत 73 धावांची भागीदारी केली. राहुलला व्हॅन मीकरेनने तर रोहितला फ्रेड क्लासेनने बाद केले. यानंतर कोहली आणि सूर्यकुमार यांनी तुफानी फलंदाजी करत भारताला 179 धावांपर्यंत नेले. T20I मध्ये कोहली आणि सूर्यकुमार यांच्यातील ही चौथी 50+ धावांची भागीदारी होती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: