IND vs ENG : काल भारताने इंग्लंडचा 100 धावांनी पराभव करत विश्वचषक 2023 मध्ये सलग सहाव्या विजयाची नोंद केली. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीच्या घातक गोलंदाजीने इंग्लिश फलंदाजांना गुडघे टेकण्यास भाग पाडले. मात्र, टीम इंडियाच्या गोलंदाजीशिवाय या सामन्यात इतरही अनेक गोष्टी होत्या ज्यांनी लोकांचे लक्ष वेधून घेतले. वास्तविक, लखनऊच्या एकना स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यासाठी हजारो चाहते आले होते.
सामन्यानंतर हजारो चाहते स्टेडियममध्ये लाइट शो दरम्यान ‘वंदे मातरम’ गाताना दिसले. हे दृश्य पाहण्यासारखे आणि भावूक करणारे होते. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे. त्याचे अनेक व्हिडिओ चाहत्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. काहींनी या दृश्याचे वर्णन अंगावर शहारे आणण्यासाखे केले आहे.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर नाणेफेक हारून प्रथम फलंदाजी करताना भारताने 50 षटकात 9 गडी गमावून 229 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 34.5 षटकांत 129 धावांवर गारद झाला. टीम इंडियाने हा सामना 100 धावांनी जिंकला. या विजयासह भारताचे सहा सामन्यांतून 12 गुण झाले असून ते उपांत्य फेरी गाठण्याच्या जवळ आहे.
दुसरीकडे, गतविजेत्या इंग्लंडला सहा सामन्यांत पाचव्या पराभवाला सामोरे जावे लागले असून त्यांचे अवघे दोन गुण आहेत. संघ विश्वचषकातून बाहेर पडला आहे. 20 वर्षांतील विश्वचषकात भारताचा इंग्लंडवर पहिला विजय आहे. त्यांचा शेवटचा विजय 2003 मध्ये होता. त्यानंतर 2011 मध्ये दोन्ही संघांमधील सामना बरोबरीत सुटला होता. त्याचवेळी 2019 मध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता.
ब्रेकिंग न्यूज – आज लाखों लोगों ने इंग्लैंड और भारत मैच में ऐक साथ वंदेमातरम 🇮🇳 गाकर विश्व रिकॉर्ड बनाया।
— Jitender Chaudhary (@JituChaudhary25) October 29, 2023
आज की जीत भारतीयों के नाम । 🎉🎉🎉🇮🇳#IndiaVsEngland #INDvENG pic.twitter.com/xdcA63dfWy