IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील चौथा सामना रांची येथे खेळला गेला. टीम इंडियाने हा सामना 5 विकेटने जिंकला आहे. हा सामना जिंकून टीम इंडियाने मालिकेत ३-१ अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. रांची कसोटी सामन्यात भारतीय संघाच्या विजयाचे हिरो आहेत आर अश्विन, ध्रुव जुरेल आणि शुभमन गिल सारखे खेळाडू. दुसऱ्या डावात टीम इंडियासाठी कर्णधार रोहित शर्माने ५५ धावा, शुभमन गिलने नाबाद ५२ आणि ध्रुव जुरेलने ३९ धावांची नाबाद खेळी केली.
दुसऱ्या डावात इंग्लंडचा डाव 145 धावांत आटोपला.
रांची कसोटी सामन्यातील पहिल्या डावानंतर इंग्लंड संघ सामना जिंकू शकेल असे वाटत होते पण तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने शानदार पुनरागमन केले. तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात अवघ्या 145 धावांत गारद झाला. दुसऱ्या डावात इंग्लिश फलंदाजांपैकी एकही फलंदाज भारतीय फिरकीपटूंना तग धरू शकला नाही आणि पाहुण्या संघाच्या विकेट्स पडत राहिल्या. जॅक क्रॉलीने दुसऱ्या डावात इंग्लंडकडून सर्वाधिक 60 धावांची खेळी केली. याशिवाय जॉनी बेअरस्टोने 30 धावा केल्या होत्या.
भारतीय फिरकीपटूंनी आपले कौशल्य दाखवले
दुसऱ्या डावात भारतीय संघाचे फिरकीपटू इंग्लंडच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवताना दिसले. दुसऱ्या डावात इंग्लंडचा संपूर्ण संघ भारतीय फिरकी गोलंदाजांनी गारद केला. दुसऱ्या डावात आर अश्विन आणि कुलदीप यादव यांनी टीम इंडियासाठी शानदार गोलंदाजी केली. आर अश्विनने 5 तर कुलदीप यादवने 4 विकेट घेतल्या. याशिवाय रवींद्र जडेजानेही एक विकेट घेतली. आज टीम इंडियाने रांची टेस्ट मॅच जिंकली तर ही सीरिजही जिंकली.
After solid resistance with the bat, Shubman Gill clears the ropes twice and brings up his FIFTY! 😎#TeamIndia only 2 runs away from a win in Ranchi!
— BCCI (@BCCI) February 26, 2024
Follow the match ▶️ https://t.co/FUbQ3MhXfH#INDvENG | @IDFCFIRSTBank | @ShubmanGill pic.twitter.com/zahlGUrYQG