IND Vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या विशाखापट्टणम कसोटीत भारताने इंग्लंडचा १०६ धावांनी पराभव केला आहे. हा सामना खूपच रोमांचक होता, पण अखेर टीम इंडियाने हा सामना जिंकला आहे. या विजयासह ही मालिका आता प्रत्येकी एक अशी बरोबरीत सुटली आहे. या मालिकेतील पहिला सामना हैदराबादमध्ये खेळला गेला होता तो इंग्लंडने जिंकला. आता विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील दुसरा सामना भारताने जिंकला आहे.
भारतीय संघाच्या वतीने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने भारताला अखेरचे यश मिळवून दिले. बुमराहने या सामन्याच्या दोन्ही डावांसह एकूण 9 विकेट घेतल्या आहेत. बुमराहने सामन्याच्या दुसऱ्या डावातही ३ बळी घेतले आहेत. दुसरीकडे, भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विननेही सामन्याच्या दुसऱ्या डावात 3 बळी घेतले आहेत. अशा प्रकारे भारताने या मालिकेत शानदार पुनरागमन केले आहे. हैदराबाद कसोटी सामन्यातील पराभवानंतर भारतासाठी विजय अत्यंत महत्त्वाचा होता, जो भारताने विशाखापट्टणममध्ये पूर्ण केला.
यशस्वी जैस्वालने पहिल्या डावात कठीण काळात द्विशतक झळकावले, ज्यामुळे टीम इंडियाला 396 धावांपर्यंत मजल मारता आली. काउंटर ॲक्शनमध्ये इंग्लंडने चांगली सुरुवात केली होती, त्यानंतर बुमराह भुकेल्या सिंहाप्रमाणे पाहुण्यांवर वर्चस्व गाजवताना दिसला.
A terrific Test match comes to an end in Vizag with #TeamIndia completing a 106-run win 👏👏
— BCCI (@BCCI) February 5, 2024
Scorecard ▶️ https://t.co/X85JZGt0EV#INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/GSQJFN6n3A