IND Vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात 25 जानेवारी ते 11 मार्च या कालावधीत पाच कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. भारतीय संघाने टी20 विश्वचषकापूर्वी अफगाणिस्तानविरुद्ध टी-20 मालिका 3-0 ने जिंकून पुन्हा आयसीसी स्पर्धेसाठी आपला दावा केला आहे. सलग दोन फायनल खेळल्यानंतर आता तिसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या विजेतेपदावर या संघाची नजर असेल. यासाठी टीम इंडिया आता 25 जानेवारीपासून इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत केपटाऊनमध्ये ऐतिहासिक विजयी कामगिरीची पुनरावृत्ती करू इच्छित आहे.
सामने कधी आणि कुठे होतील?
पहिली कसोटी- 25-29 जानेवारी, हैदराबाद (राजीव गांधी स्टेडियम)
दुसरी कसोटी- 2-6 फेब्रुवारी, विशाखापट्टणम (डॉ. Y.S.R. रेड्डी क्रिकेट स्टेडियम)
तिसरी कसोटी- 15-19 फेब्रुवारी, राजकोट (सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम)
चौथी कसोटी- 23-27 फेब्रुवारी, रांची (जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम कॉम्प्लेक्स)
पाचवी कसोटी- 7-11 मार्च, धर्मशाला (HPCA स्टेडियम)
सामने किती वाजता होतील?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 वाजता सुरू होईल. या सर्व सामन्यांमध्ये पहिले सत्र सकाळी 9.30 ते 11.30 पर्यंत असेल. त्यानंतर 40 मिनिटांचा लंच ब्रेक असेल, त्यानंतर 12.10 ते 2.10 पर्यंत दुसरे सत्र होईल. यानंतर 20 मिनिटांचा चहा ब्रेक होईल. त्यानंतर शेवटचे सत्र दुपारी 2.30 ते 4.30 वाजेपर्यंत खेळवले जाईल.
तुम्ही लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहू शकाल?
या मालिकेतील सर्व कसोटी सामन्यांचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी चाहते स्पोर्ट्स 18 चॅनलशी कनेक्ट राहू शकतात. आणि चाहते डिजिटल चॅनेलवर लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी Jio Cinema शी कनेक्ट राहू शकतात.
दोन्ही संघांची पथके
इंग्लंड : बेन स्टोक्स (कर्णधार), जॅक क्रॉली, बेन डकेट, रेहान अहमद, जॉनी बेअरस्टो, शोएब बशीर, हॅरी ब्रूक, बेन फोक्स, जेम्स अँडरसन, गस ऍटकिन्सन, टॉम हार्टले, जॅक लीच, ऑली पोप, ऑली रॉबिन्सन, जो रूट मार्क वुड.
भारत (पहिल्या दोन कसोटी): रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आवेश खान.
JioCinema poster for India vs England Test series…!!!!
— Johns. (@CricCrazyJohns) January 18, 2024
– It's Rohit vs Stokes. 🔥 pic.twitter.com/uI0MKZmkel