IND Vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना हैदराबाद येथे खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने पहिल्या डावात इंग्लंडला 246 धावांत ऑलआउट केले. यानंतर भारतीय संघ फलंदाजीला आला आणि पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 1 गडी गमावून 119 धावा केल्या. भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल 76 धावांवर नाबाद आहे. दुसरीकडे, शुभमन गिल 14 धावा करून नाबाद आहे.
पाहुण्या संघाची सुरुवात चांगली झाली पण त्यानंतर भारतीय फिरकीपटूंनी आश्चर्यकारक कामगिरी करण्यास सुरुवात केली. रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजाने इंग्लंडच्या टॉप ऑर्डरला आपल्या फिरकीत अडकवले. त्यानंतर अक्षर पटेल बॉलिंगसाठी आला. अक्षरने जेवणानंतर अक्षरशः इंग्रजांच्या टीमचे कमरडे मोडले. ज्या चेंडूवर त्याने जॉनी बेअरस्टोला क्लीन बोल्ड केले त्या चेंडूची सर्वाधिक चर्चा झाली आणि लोकांनी त्याला मॅजिक बॉल देखील म्हटले.
अक्षर पटेलच्या या चेंडूत उत्कृष्ट टर्न पाहायला मिळाला. त्याचा चेंडू मधल्या स्टंपवर गेला पण वळल्यानंतर बेअरस्टोचा स्टंप उखडला. यानंतर बेअरस्टोचाही तोल गेला आणि त्याचे हात जमिनीवर आले. त्याला आलेला चेंडू समजलाच नाही, त्याच्या बॉलचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. लोकांनाही याला खूप पसंती मिळत आहे.
भारतीय फिरकीपटूंची जादू
हैदराबाद कसोटीच्या पहिल्या दिवसापासून भारताच्या फिरकीपटूंनी कमाल दाखवायला सुरुवात केली आहे. पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रापर्यंत इंग्लंडने 8 विकेट गमावल्या होत्या. यापैकी सात विकेट फिरकीपटूंनी घेतल्या. रवींद्र जडेजाने तीन विकेट घेतल्या. तर अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विनने २-२ बळी घेतले. पहिल्या सत्रात तीन विकेट पडल्या आणि दुसऱ्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी पाच बळी घेतले.
चहापानाच्या वेळेपर्यंत इंग्लंडची धावसंख्या 8 गड्यांच्या मोबदल्यात 215 धावा होती. चहापानाच्या ब्रेकपर्यंत कर्णधार बेन स्टोक्स 43 धावांवर नाबाद होता. या सामन्यात रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांनी एकत्र सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम केला आणि भारताची सर्वात यशस्वी जोडी ठरली. भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे.
𝗧𝗵𝗮𝘁. 𝗪𝗮𝘀. 𝗔. 𝗕𝗲𝗮𝘂𝘁! ⚡️ ⚡️@akshar2026 with his first wicket of the match 👏 👏
— BCCI (@BCCI) January 25, 2024
Follow the match ▶️ https://t.co/HGTxXf8b1E#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/liBwODtcrM