IND Vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना हैदराबादमध्ये खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाचा 28 धावांनी पराभव केला. यासह इंग्लंडने आता मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. हैदराबाद कसोटीत भारताच्या पराभवाबरोबरच एक मोठा विक्रमही मोडीत निघाला आहे.
या सामन्यात टीम इंडियाकडे पहिल्या डावानंतर 190 धावांची आघाडी होती. असे असतानाही टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागले. दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी निराशा केली. शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर पुन्हा एकदा फ्लॉप ठरले.
भारतीय संघासोबत कसोटी क्रिकेटमध्ये संघाकडे 100 पेक्षा जास्त धावांची आघाडी आणि नंतर पराभव होण्याची ही पहिलीच वेळ आहे. पहिल्या डावात भारतीय संघाने 436 धावा केल्या होत्या, त्यानंतर टीम इंडियाकडे 190 धावांची आघाडी होती.
दुसरीकडे, इंग्लंडने दुसऱ्या डावात शानदार फलंदाजी करत 420 धावा केल्या. त्यानंतर हा सामना जिंकण्यासाठी भारतीय संघासमोर 231 धावांचे लक्ष्य होते. 231 धावांच्या प्रत्युत्तरात टीम इंडिया दुसऱ्या डावात 202 धावांवर ऑलआऊट झाली आणि इंग्लंडने 28 धावांनी सामना जिंकला.
India's record while having 100+ runs lead in the first innings at home:
— Johns. (@CricCrazyJohns) January 28, 2024
Matches – 106
Won – 70
Draw – 35
Lost – 1 (Today at Hyderabad) pic.twitter.com/l3l3y31BtH
याआधी टीम इंडियाने 2001 मध्ये ऑस्ट्रेलियाला अशाप्रकारे पराभूत केले होते. 2001 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने 274 धावांची आघाडी घेतली होती. या फॉलोऑन सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला.
India from 2013 to 2022: 2 Tests lost at home.
— Johns. (@CricCrazyJohns) January 28, 2024
India in last 1 year: 2 Tests lost at home. pic.twitter.com/CIt23xDrww
याआधी पाहुणा संघ म्हणून ऑस्ट्रेलियाने 1964 साली पहिल्या डावात आघाडी घेत भारतीय संघाचा पराभव केला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात भारतीय संघावर 65 धावांची आघाडी घेतली होती. आता 2024 मध्ये पाहुण्या संघावर 100 हून अधिक धावांची आघाडी मिळवून भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. इंग्लंडच्या विजयात टॉम हार्टले आणि ऑली पोप यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
इंग्लंडकडून दुसऱ्या डावात फलंदाजी करताना ओली पोपने १९६ धावांची खेळी केली. याशिवाय दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना टॉम हार्टलेने 7 बळी घेतले.