IND Vs AUS : चेन्नई चे स्टेडियम भारतीय टीमसाठी फारस लकी नाही, कारण या स्टेडियम वरच्या टीम सामन्यात दोन वेळा ऑस्ट्रेलिया संघ वरचढ होता, मात्र कालचा विश्वचषक 2023 च्या पाचव्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखून पराभव केल्यामुळे बरोबरी झाली आहे. या विजयासह भारताने विश्वचषकाची शानदार सुरुवात केली आहे. हा सामना अतिशय रोमांचक होता. भारताने हा सामना ज्या प्रकारे जिंकला, त्यामुळे चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर 200 धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक तीन बळी घेतले. याशिवाय कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराहने २-२ बळी घेतले. भारतासाठी हे लक्ष्य खूपच सोपे जाणार आहे असे वाटत होते, पण भारताचा डाव सुरू होताच काय झाले यावर विश्वास ठेवणे कठीण झाले.
राहुल आणि कोहलीच्या जोडीने कमाल केली
भारताकडून कर्णधार रोहित शर्मा आणि इशान किशन सलामीला आले. भारत हे लक्ष्य सहज गाठेल असे वाटत होते, मात्र मिचेल स्टार्कने इशान किशनला शून्यावर बाद केले. यानंतर रोहित शर्माही शून्य धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. रोहितपाठोपाठ श्रेयस अय्यरही शून्यावर आऊट झाल्यामुळे हद्द झाली. टीम इंडियाला येथून विजय मिळवणे कठीण दिसत आहे. पण त्यानंतर फलंदाजीला आलेल्या विराट कोहली आणि केएल राहुलने भारतीय संघाची कमान आपल्या खांद्यावर घेतली आणि शतकी भागीदारी करत संघाला सामना जिंकून दिला.
केएल राहुलने विजयी षटकार ठोकला
या रोमांचक सामन्यात विराट कोहलीने 85 धावांची खेळी केली. याशिवाय केएल राहुलनेही 97 धावांची नाबाद खेळी खेळली आहे. दोघांमध्ये 165 धावांची भागीदारी झाली. या दोघांमधील या भागीदारीने संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघावर छाप पाडली. मात्र, विराटचे 48 वे शतक हुकले. कोहलीला वनडे विश्वचषकातील तिसरे शतक झळकावण्याची संधी होती, पण तो ८५ धावांवर बाद झाला. यानंतर हार्दिक पांड्या फलंदाजीला आला. शेवटी केएल राहुलने विजयी षटकार ठोकत सामना भारतीच्या झोळीत टाकला. अशाप्रकारे भारताने विश्वचषकातील पहिला सामना अवघ्या 41.2 षटकांत जिंकला आहे.
India overcome an early wobble to take their opening #CWC23 by a comfortable margin 💪#INDvAUS 📝: https://t.co/Qh7kBjviYJ pic.twitter.com/pbTH3UMLkf
— ICC (@ICC) October 8, 2023