Saturday, December 21, 2024
HomeMarathi News TodayIND vs AUS T20 | भारताने ऑस्ट्रेलियाचा 6 विकेट्सने केला पराभव...रोहितची विश्वविक्रमी...

IND vs AUS T20 | भारताने ऑस्ट्रेलियाचा 6 विकेट्सने केला पराभव…रोहितची विश्वविक्रमी खेळी…

Ind Vs Aus 2nd T20 : नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या T20 सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 8 षटकांत 91 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 4 चेंडू राखून 6 विकेट्स राखून सामना जिंकला. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने 46 धावा केल्या.

91 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली. कर्णधार रोहित शर्माने सुरुवातीच्या षटकांमध्ये अनेक षटकार ठोकत संघाला चांगली सुरुवात करून दिली. भारताची पहिली विकेट तिसऱ्या षटकात केएल राहुलच्या रूपाने गेली. राहुल 6 चेंडूत 10 धावा करून बाद झाला. विराट कोहली 6 चेंडूत 11 धावा करून बाद झाला.

नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने निर्धारित 8 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात 90 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू वेडने 43 धावा केल्या. कर्णधार एरॉन फिंचने 31 धावा केल्या. भारताकडून अक्षर पटेलने दोन बळी घेतले.

प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाला दुसऱ्याच षटकात कॅमेरून ग्रीनच्या रूपाने पहिला धक्का बसला. 5 धावा करून तो धावबाद झाला. त्यानंतर अक्षर पटेलने पहिल्याच चेंडूवर मॅक्सवेलला क्लीन बोल्ड केले. पुढच्या षटकात टीम डेव्हिडही क्लीन बोल्ड झाला. मात्र, मॅथ्यू वेडने धोकादायक फलंदाजी करताना 20 चेंडूत 43 धावा केल्या.

रोहित शर्माने हेजलवूडच्या पहिल्याच षटकात दोन खणखणीत षटकार खेचक रोहित शर्माने सर्वाधिक षटकार लगावण्याचा अनोखा विश्वविक्रम स्वत:च्या नावावर केला. रोहित आता टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार लगावाणारा खेळाडू ठरला आहे.

रोहितने मारलेल्या षटकारांची संख्या १७६ इतकी झाली. ही मालिका सुरु होण्यापूर्वी रोहितच्या नावावर १७१ षटकार आणि ३२३ चौकार होते. पहिल्या टी-२० सामन्यात रोहितने एक षटकार मारुन न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टीन गप्टीलच्या १७२ षटकारांच्या विक्रमाची बरोबरी केली होती. दुसऱ्या सामन्यात पहिल्या दोन षटकांमध्ये तीन षटकार लगावत रोहितने सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: