Ind vs Aus T20 सूर्यकुमार यादव आणि विराट कोहलीच्या अर्धशतकांच्या जोरावर टीम इंडियाने रविवारी खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखून पराभव केला.
कॅमेरून ग्रीन (52) आणि टीम डेव्हिड (54) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 20 षटकांत 7 गडी गमावून 186 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने हा सामना 1 चेंडू शिल्लक असताना 6 विकेटने जिंकला. या विजयासह भारताने मालिका 2-1 अशी जिंकली आहे.
मोहालीतील मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने ४ गडी राखून जिंकला, तर नागपुरातील दुसरा सामना भारताने ६ गडी राखून जिंकला. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारताकडून सूर्यकुमार यादवने 69 धावा आणि विराट कोहलीने 63 धावा केल्या.
T20 क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम पाकिस्तानच्या नावावर होता. बाबर आझमच्या संघाने गेल्या वर्षी एकूण 20 सामने जिंकले होते, तर यावर्षी 9 महिन्यांत टीम इंडियाने 21 सामने जिंकून पाकिस्तानचा हा विश्वविक्रम मोडला आहे. ऑस्ट्रेलियाला हरवून भारताने ही कामगिरी केली आहे.
ऑस्ट्रेलियाने 7 बाद 186 धावा केल्या. भारताला आता मालिका जिंकण्यासाठी 187 धावा करायच्या होत्या. कांगारूंसाठी जोस इंग्लिसने 52 आणि टीम डेव्हिडने 54 धावा केल्या. डॅनियल सेम्सनेही नाबाद २८ धावा केल्या. भारताकडून अक्षर पटेल सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, त्याने तीन बळी घेतले.