IND vs AUS T20 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 सामन्यांची T20 मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिला सामना जिंकून टीम इंडिया १-० ने आघाडीवर आहे. आता या मालिकेतील दुसरा सामना आज 26 नोव्हेंबरला तिरुवनंतपुरममध्ये खेळवला जाणार आहे.
भारताचा युवा संघ या मालिकेत खेळत असून पहिल्याच सामन्यात भारतीय युवा खेळाडूंनी आपण कोणापेक्षा कमी नसल्याचे दाखवून दिले आहे. आता सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला दुसरा सामना जिंकून मालिकेत २-० अशी आघाडी घ्यायची आहे. तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड स्टेडियमवर भारतीय संघाचा विक्रमही चांगलाच गाजला आहे.
तिरुअनंतपुरममध्ये टीम इंडियाचा रेकॉर्ड उत्कृष्ट
टीम इंडियाने आतापर्यंत तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफील्ड स्टेडियमवर तीन टी-20 सामने खेळले आहेत. यापैकी भारताने दोन जिंकले असून एक पराभव झाला आहे. या मैदानावर भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्धचा एकमेव सामना हरला होता. भारतीय संघाने 2017 मध्ये येथे पहिला सामना न्यूझीलंडसोबत खेळला होता.
टीम इंडियाने हा सामना 6 धावांनी जिंकला. यानंतर दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाला वेस्ट इंडिजविरुद्ध 8 विकेटने पराभव स्वीकारावा लागला. भारताने 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेसोबत येथे शेवटचा टी-20 सामना खेळला होता. भारतीय संघाने हा सामना 8 विकेटने जिंकला. आता या मैदानावर चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ भारताशी भिडणार आहे.
सूर्यकुमारचा ग्रीनफिल्डवरील रेकॉर्डही उत्कृष्ट आहे
या मैदानावर सूर्यकुमार यादवचा विक्रमही उत्कृष्ट आहे. 2022 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात सूर्यकुमार यादवने केवळ 33 चेंडूत अर्धशतक झळकावले होते. आता पुन्हा एकदा संघाला त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असेल. मालिकेतील पहिल्याच सामन्यात सूर्यकुमारचे तुफान पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात सूर्याने 80 धावांची शानदार खेळी करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
ऑस्ट्रेलिया: ट्रॅव्हिस हेड/मॅथ्यू शॉर्ट, स्टीव स्मिथ, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, टिम डेविड, मॅथ्यू वेड (कर्णधार/ विकेटकीपर), सीन एबॉट, नॅथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ, एडम झाम्पा.
भारत: ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल, इशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, रिंकू सिंह, अक्षर पटेल, रवि बिश्नोई/आवेश खान, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार, प्रसिद्ध कृष्णा.