Income Tax Raid : आयकर विभागाने ओडिशा आणि झारखंडमधील बौध डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेडवर छापा टाकला आणि कंपनीच्या आवारातून मोठ्या प्रमाणात चलनी नोटा जप्त केल्या. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओडिशातील बोलंगीर आणि संबलपूर आणि झारखंडमधील रांची, लोहरदगा येथे शोध सुरू आहे. प्राप्तिकर विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कालपर्यंत 50 कोटी रुपयांच्या नोटांची मोजणी पूर्ण झाली आहे, मात्र नोटांची संख्या एवढी जास्त आहे की मशिन्सने काम करणे बंद केले आहे.
बौध डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड या दारू उत्पादक कंपनीच्या अनेक विभागांवर आयकर विभागाचे छापे गुरुवारी दुसऱ्या दिवशीही सुरूच होते. आयकर विभागाच्या अधिकार्यांनी बलदेव साहू अँड ग्रुप ऑफ कंपनीजच्या बोलंगीर कार्यालयावर छापा टाकून 150 कोटी रुपयांहून अधिक रोख जप्त केले, जे पश्चिम ओडिशातील सर्वात मोठ्या देशी दारू उत्पादक आणि विक्री कंपन्यांपैकी एक आहे.
बलदेव साहू आणि ग्रुप ऑफ कंपनीज ही बौध डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेड (BDPL) ची भागीदारी फर्म आहे, ज्यावर काल छापा टाकण्यात आला.
ओडिशामध्ये मुख्यालय असलेले, बीडीपीएल समूह राज्यभर कार्यरत आहे. त्याच्या इतर व्यवसाय विभागांमध्ये बलदेव साहू इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड (फ्लाय एश ब्रिक्स), क्वालिटी बॉटलर्स प्रायव्हेट लिमिटेड (IMFL बॉटलिंग) आणि किशोर प्रसाद विजय प्रसाद बेव्हरेजेस प्रायव्हेट लिमिटेड (IMFL ब्रँड्सची विक्री आणि विपणन) यांचा समावेश आहे.
याशिवाय आयकर विभागाने बोलंगीर शहरातील सुदापारा आणि टिटीलागड शहरातील दोन मद्यविक्रेत्यांच्या घरांवरही एकाच वेळी छापे टाकले होते, तिथूनही रोकड जप्त करण्यात आली होती.
या जप्तीनंतर प्राप्तिकर विभागाने काल रात्री स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बोलंगीर शाखेत एका मोठ्या ट्रकमधून बॅग आणि रोख रक्कम आणली. ते सर्व पैसे बँकेत नेऊन कडेकोट बंदोबस्तात जमा करण्यात आले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओडिशातील टिटीलागढ येथील दीपक साहू आणि संजय साहू या दोन मद्यविक्रेत्याच्या घरांचीही झडती घेण्यात आली. परंतु आयकर छापेमारीबाबत माहिती मिळाल्यानंतर दोन्ही व्यावसायिकांनी शहरातून पळ काढला. या दोन्ही मद्यविक्रेत्यांनी कोट्यवधी रुपयांचा आयकरही बुडवला असल्याचा आरोप आहे.
I-T raid on Boudh Distillery Private Limited: Income tax sleuths reportedly seize cash worth Rs 50 crore during raids on distillery & other places linked to it; raids also reported from Kolkata, odhisa & Ranchi in connection with the matter. Political funding under scanner. pic.twitter.com/QjzuHNlKqH
— Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) December 7, 2023