देवानंद चक्रे व पत्नी सुकेशनी चक्रे, मुलगी आरती चक्रे हे बचावलेले कुटुंब…
देवतारी त्याला कोण मारी…
वुत्तसेंवा – अतुल नवघरे
लाखपुरी ‘ता.१६ , मुर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरी येथील देवानंद रामा चक्रे वय -४२ वर्ष, पत्नी सुकेशनी चक्रे -वय -३२ वर्ष , मुलगी -आरती चक्रे -वय -११ वर्ष , सदर कुटुंबाची घरची परिस्थिती अतिशय हालाखीची असून सदर कुटुंब हे भूमीहीन असून शासनाकडून सदर कुटुंबाला मदतीची अपेक्षा आहे . सदर कुटुंबाकडे शेती नसुन घरात – ३ सदस्य असुन आहे . दि.१५ फेब्रुवारीला दुपारी -१२ वा. घराची भिंत पडली , घरात पती व पत्नी हे दोघे ही आपल्या घरात बसून होते.
दुपारच्या सुमारास देवानंद चक्रे यांना भिंत पडणार याची चाहूल लागल्याने ते आणि त्यांची पत्नी पटकन घराबाहेर आले. त्यामध्ये ते सुदैवाने त्यांच्या दोघांचाही जीव वाचला परंतु भिंत पडल्यामुळे घरातील साहित्य व ईतर वस्तुचा नुकसान झाले आहे . सदर भिंत पडल्यामुळे घरामध्ये बसण्यात सुद्धा भीती वाटत आहे.
काल दि.१५ ला दुपारी -१२ वाजता पासून कुठलाही अधिकारीवर्ग यांनी सदर कुटुंबाकडे जावून भेट दिली नाही व महसूल विभागाचे कर्मचारी यांनी सुद्धा सदर कुटुंबाच्या घराचा अद्याप पर्यंत पंचनामा करण्याचा मुहूर्त निघाला नाही .सदर कुटुंब खुप गरीब असुन त्यांचे पूर्ण घर शिकस्त झाले आहे. सदर कुटुंब मोलमजुरी करून त्यावर आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह ते कुटुंब करत असते . त्या कुटुंबाला जगावे कसे हा प्रश्न त्याच्या समोर पडला आहे . या कुंटुबाकडे कोणी लोकप्रतिनिधी पुढारी लक्ष देण्यास तयार नाही.
आता तरी प्रशासन याकडे लक्ष देणार का का जिव गेल्या वर लक्ष देणार हा प्रश्न सर्वांना पडला आहे .त्या कुटुबांचे रमाई आवास योजनें मध्ये नाव आहे पण घरकुल मिळते की नाही हा प्रश्न त्या कुटुंबाला पडला आहे. तरि संबधित विभागाने रमाई आवास योजने मध्ये या कुटुबाला लवकर घरकुल द्यावे अशी मागणी जोर धरु लागली आहे.
दि.१५ फेब्रु. ला. दुपारी १२ वा. घराची भिंत पडुन सुदैवाने लाखपुरी येथील देवानंद चक्रे यांचे कुंटुब बचावले परन्तु सदर कुटुंब खुप गरीब असुन त्या कुटुबांची महसुल विभाने घराची पाहणी करुन तात्काळ मदत द्यावी . व रमाई आवास मधील घरकुल योजनेचा त्या कुटुबांला संबंधित विभागाने प्राधान्य द्यावे. ( सौ. मिनल नवघरे , माजी.पं. स. सदस्या लाखपुरी )
बुधवारी दुपारी १२ ला .मी व माझी पत्नी घरात होतो . परंतु मला भिंत पडत असल्यांची चाहुल येताच मी व माझी पत्नी बाहेर आलो व भिंत पडली यामध्ये माझ्या घरांचे सामानाचे नुकसान झाले व परन्तु सुदैवाने आमचा जिव वाचला . मला घरकुल मिळणार की नाही हे मात्र अद्याप पर्यंत गुलदस्त्यात आहे – ( देवानंद चक्रे )
लाखपुरी येथील भिंत पडली परंतु ते नैसर्गिक आपत्तीमध्ये बसत नाही तरी . तरी सदर कुटुंबाला मदत देता येत असेल तर त्या बाबत मंडळ अधिकारी , तलाठी लाखपुरी यांना पंचानामा करण्यासंदर्भात सांगतो.
प्रदीप पवार ( तहसिलदार मुर्तिजापुर )