पातूर – निशांत गवई
बाळापूर तालुक्यातील पोलीस चौकी अंतर्गत येत असलेल्या वाडेगाव मध्ये दिनांक ३० में रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास चार चाकी कार मध्ये पिस्तूल सह जिवंत राउंड पकडल्याबाबत एकच खळबळ उडाली असून वृत्त लिहे पर्यंत आरोपी वर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
दिनांक ३०.०५.२०२४ रोजी गोकुल राज जी, सहायक पोलीस अधीक्षक, तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, बाळापूर जि. अकोला यांना गुप्त माहिती मिळाली की, खामगांव जि. बुलढाणा येथुन एक पांढ-या रंगाची इर्टीगा कार क. एम एच -३७ या ३४९० ही बाळापूर कडे निघाली असुन त्यामध्ये एकुण ०७ तरूण इसम बसलेले असुन त्यांचेकडे अग्नीशस्त्र आहे.
व ते कोणतातरी दखलपात्र गुन्हा करण्याचे बेतात आहे अशा माहिती बरून उपविभागीय पोलीस अधिकारी, बाळापूर यांचे मार्गदशनाखाली पोलीस स्टॉपसह शासकिय वाहनाने वाडेगाव ता. बाळापूर जि. अकोला येथे जावून शासकिय पंचाराह सिध्दार्थ चौक वाडेगाव येथे नाकाबंदी केली असता अंदाजे ५.४० वा.चे सुमारास एक पांढ-या रंगाची इटीगा कार क. MH-37 AD-3490 ही बाळापूर कडून पातूर रोडने येत असतांना दिसली सदर कार नमुद पोलीस स्टॉफ यांचे मदतीने थांबविली असता सदर कारमध्ये सात इसम मिळुन आले.
त्यांना पंचासमक्ष कार चे बाहेर काढून त्यांचे नांच व गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव १) राहुल भगवान खिल्लारे वय २६ वर्ष रा. शाहूनगर हिंगोली, २) ऋतिक कल्यानराव वाढवे वय २१ वर्ष रा. पिंपळखेड जि. हिंगोली ३) सुर्यकिरण बळीराम चोरमल वय २३ वर्ष रा. इसापूर रमना, ता. जि. हिंगोली, ४) अंकुश रमेश कंकाळ वय २२ वर्ष रा. सावरगाव (बडी) ता. जि. वाशिम, ५) नितेश मधुकर राउन्नवय ३५ वर्ष रा. जांभरूण जहांगीर ता.जि. वाशिम,
६) सुमित शेषराच पुंडगे वय २२ वर्ष रा. पिंपळखेड जि. हिंगोली, देवानंद अमृता इंगोले वय २६ वर्ष रा. सावळी ता. जि. वाशिम असे सांगीतले वरून पंचासंमक्ष त्यांची झडती घेतली असता राहुल भगवान खिल्लारे वय २६ वर्ष रा.शाहूनगर हिंगोली याचे ताब्यातुन एक देशी बनावटी वी पिस्टल व ०७ जिवंत राउंड कि. अं. २५ हजार रू. तसेच वेग-वेगळया कंपणीचे मोबाईल किं. अं.६० हजार रू. तसेच चालक नितेश मधुकर रहत याचे ताब्यातुन एक पांढ-या रंगाची इटींगा कार क. MH-37 AD-3490 कि.अं. ७ लाख रू. असा एकुण ७,८५,०००/- रू. (सात लाख पंचाअंशी हजार रूपयाचा) मुद्देमाल पंचा समक्ष जप्त पंचनाम्याप्रमाणे जप्त करण्यात आला आहे.
व पो. स्टे. बाळापूर येथे वरील नमुद आरोपी हे संगणमत करून त्यांचेमध्ये अग्नीशरत्र लाल तिखट पावडर, दोरी, टॉर्च, एक चाकु बाळगुन रोडने दरोडा टाकण्याचे प्रयत्नात जात असतांना मिळुन आल्याने त्यांचे विरुध्द भादंवि व आर्म अॅक्ट कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. श्री बच्चन सिंह, पोलीस अधीक्षक अकोला, मा. श्री अभय डोंगरे, अपर पोलीस अधीक्षक अकोला तसेच श्री गोकुल राज जी सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, बाळापूर जि. अकोला यांचे मार्गदर्शनाखाली पो नि. श्री अनिल जुगळे, APP समाधान रिटे, पंकज कांबळे, विनोद घुईकर, ASI विनायक पवार, शिरसाठ, शिवकुमार वर्मा, संजय वानखडे, II.C. रोमशः शारीक, संतोष सोळंके, संतोष करंगळे, अंकुश मोरे, रफीक शेख, विजय गि-हे, NPC संजीव कोल्हटकर, गणेश गावंडे, रातिष वाडेकर, पोकॉ. अक्षय देशमुख, प्रविण अवचार, गोहन ढाकरे, विठ्ठल उकडे (गाठली, गजानन शिंदे, मनिष यांनी केली आहे.