रामटेक – राजु कापसे
रामटेक – दि. १६ फेब्रुवारी २०२४ रोजी पेंच व्याघ्र प्रकल्प, महाराष्ट्र अंतर्गत विविध उपक्रमाचा शुभारंभ राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री मा.श्री.सुधीरजी मुनगंटीवार यांच्यासह उपस्थित राहुन केले.
यात पेंच व्याघ्र प्रकल्पातील खुर्सापार नूतन सफारी गेट, कोलितमारा येथे परम्युटेशन व हॉट एअर बलून हा साहसी क्रीडा उपक्रम, वाघोली तलाव येथे डार्क स्काय प्रकल्प आणि हत्ती कॅम्पचे उद्घाटन करण्यात आले. तसेच ‘पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या कॉफीटेबल बूक’ आणि ‘पक्षी सर्वेक्षण अहवाला’चे प्रकाशन करण्यात आले.
राज्य शासनाने वनक्षेत्रातील जनतेच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. आस्थापना खर्च वजा करून तेंदूपत्ता मजुरांना ७२ कोटी रुपयांचे बोनस देण्यात आले आहेत. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना २५ लाखांची सानुग्रह मदत करण्यात येते.
याप्रसंगी रामटेक विधानसभेचे आमदार आशिष जयस्वाल, जिल्हा परिषदेच्या सदस्य शांताताई कुंभरे, श्री.विवेक तुरक, श्री.बंडुजी सांगोडे, प.स.सदस्य श्री.चंद्रकांत कोडवते, श्री.संजय नेवारे, पिपरिया गावचे सरपंच श्री.प्रवीण उईके, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्री.महिप गुप्ता, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक शोमिताबिश्वास, पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. प्रभुनाथ शुक्ला उपस्थित होते.