मुंबई – गणेश तळेकर
“मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया” अर्थात “माई” या राष्ट्रीय संघटने अंतर्गत ‘माई मीडिया २४’ या वेबपोर्टलचे उद्घाटन उपसभापती नीलमताई गोरे आणि उद्योगमंत्री उदयजी सामंत यांच्या शुभं हस्ते विधान भवनाच्या प्रांगणात संपन्न झालं. प्रसंगी माई संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष शितल कर्देकर आणि सचिव सचिन चिटणीस उपस्थित होते.
माई मीडिया २४ हा डिजिटल विश्वातील विश्वसनीय आणि सच्चा पत्रकारितेचे उन्मुक्त माध्यम आहे. जे राजकीय, व्यवसाय, मनोरंजन अशा विविध क्षेत्रातील घडामोडींचे त्वरित आणि योग्य वृत्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तत्पर राहणार आहे. तसेच सहकार तत्त्वावर काम करणारे पत्रकारितेचे हे पहिलेच डिजिटल माध्यम आहे.
या उद्घाटन प्रसंगी उपसभापती नीलमताई गोरे यांनी उत्साही प्रतिक्रिया देत हा उपक्रम पत्रकार क्षेत्रातील नवी आणि सकारात्मक क्रांती घडवणारा असेल अस म्हणत शुभेच्छा दिल्या. शिवाय संघटनेचे अध्यक्ष शितल कर्देकर या आजच्या काळातील रजनी आहेत असे शब्द उच्चारत त्यांचं कौतूक केलं.
तसेच उद्योगमंत्री उदयजी सामंत यांनी माई मीडिया २४ हे सहकार तत्त्वावर काम करणार असणार म्हणून यातून पत्रकारितेत स्थिरता येईल आणि हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उत्तम मंच ठरेल अशा शब्दात शुभेच्छा दिल्या.
या उद्घाटन सोहळ्याला माई मीडिया २४ चे मुख्य संपादक आणि माई संघटनेचे संस्थापक आणि अध्यक्ष शितल कर्देकर, पोर्टलचे संपादक आणि संघटनेचे सचिव सचिन चिटणीस, कोशाध्यक्ष चेतन काशीकर, सल्लागार संतोष भिंगार्डे, पोर्टलचे उपसंपादक गणेश तळेकर आणि सुरज खरटमल, संस्थापक सदस्य सुनील कटेकर उपस्थित होते.