Monday, December 23, 2024
Homeराज्यबिलोली अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन संपन्न :सर्व सोयी-सुविधांमुळे...

बिलोली अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन संपन्न :सर्व सोयी-सुविधांमुळे सर्वांच्या सहकार्यातून न्यायदानाचे कार्य अधिक गतीमान होईल – न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी…

महेंद्र गायकवाड
नांदेड
बिलोली येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीत न्यायदानासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. या सुसज्ज व सुदंर इमारतीत सर्वांच्या सहकार्याने चांगल्या वातावरणात न्यायदानाचे काम पार पडणार आहे. आधुनिक सोयी-सुविधांमुळे कामाचा दर्जा अधिक वाढणार असून न्यायदानाचे कार्य अधिक गतीमान होईल, असे प्रतिपादन न्यायमूर्ती नितीन सुर्यवंशी यांनी केले. बिलोली येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी प्रमूख जिल्हा न्यायाधीश नागेश वि. न्हावकर, धुळयाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आरेफ महमद साहेब, बिलोलीचे जिल्हा न्यायाधीश दिनेश ए. कोठलीकर, न्यायाधीश श्रीमती रामगडीया, उपविभागीय अधिकारी सचिन गिरी, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष व सदस्य बी.डी. साळुंखे, बिलोली अभिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲड. शिवकुमार पाटील, देगलूर, बिलोली, धर्माबाद, नायगाव न्यायालयातील विधीज्ञ, न्यायालयीन अधिकारी, कर्मचारी, पक्षकार आदीची उपस्थिती होती. यावेळी न्यायमूर्ती नितीन सुर्यवंशी यांच्या हस्ते जेष्ठ विधीज्ञाचा सत्कार करण्यात आला.

बिलोली जिल्हा व सत्र न्यायालयाची भव्य व सुसज्ज इमारतीचे क्षेत्रफळ 1912.91 चौ मीटर असून यात दोन मोठे कोर्ट हॉल, लोकअदालतीसाठी एक कोर्ट हॉल, दोन अभिलेख कक्ष दिवाणी व फौजदारी संचिकेकरीता, वित्त विभाग स्ट्रॉग रूम, मुद्देमाल कक्ष, महिला अभिवक्ता हॉल, कॅटींग, फायर सेफ्टी सिस्टिम, हायजेनिक सॅनिटरी सिस्टिम, सीसीटीव्ही, गार्डन, वॉटर हार्वेस्टिंग सिस्टिम, सोलार सिस्टिम आदी सोयी सुविधांनीयुक्त प्रशस्त अशा इमारतीचे अवलोकन न्यायमूर्ती नितीन सुर्यवंशी यांनी केले. वकील व न्यायाधीश या नाण्याच्या दोन बाजू असून एकमेकांच्या सहकार्याशिवाय न्यायदानाचे काम अपूर्ण असून जेष्ठ विधी ज्ञानाच्या मार्गदर्शनाने न्यायदानाचे हे काम अधिक कार्यक्षमतेने करावे. तसेच न्यायालयीन कामकाज सुसह्य होण्यासाठी न्यायालयीन प्रशासन सर्व ते सहकार्य करेल असेही न्यायमूर्ती नितीन सुर्यवंशी यांनी सांगितले.

हे न्यायालय उभारणीत अनेकांचे श्रेय असून अंदाजे 9 कोटी रुपये खर्च करुन ही आधुनिक इमारत सर्व सुविधेसह उभारली आहे. सध्या न्यायालयीन कामकाजात ई-कोर्ट सुविधा आली असून ई-कोर्ट सुविधा विधीज्ञांनी स्विकारली पाहिजे. त्यामुळे न्यायदानाचे काम कमी मनुष्यबळात व कमी वेळेत पार पडेल. तसेच वकीलांना स्वत:च्या कामकाजाची दैनंदिनी तयार होईल. हा बदल सर्वांनी सकारात्मकतेने स्विकारला पाहिजे. या बदलाची प्रक्रिया समजून घेतल्यास ज्ञान वृद्धी होवून याचे फायदे समजतील. येत्या 5 मार्चला याबाबत सर्व विधीज्ञासाठी प्रशिक्षण ठेवले असून अभिवक्त्यांनी या प्रशिक्षणाचा उर्त्स्फूतपणे लाभ घ्यावा असे आवाहन प्रमूख जिल्हा न्यायाधीश नागेश वि. न्हावकर यांनी केले. नांदेड न्यायालयात 1276 प्रकरणे ई-फायलिंग झाले आहे. समाजातील सर्वासाठी न्याय ही संकल्पना असून अंतिम घटकापर्यंत न्याय पोहचविण्यासाठी सर्वांनी सहकार्य केले पाहिजे. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील असेही प्रमूख जिल्हा न्यायाधीश श्री. न्हावकर यांनी सांगितले.

बिलोली न्यायालयाच्या कामकाजाचा विस्तार अधिक असून या नवीन इमारतीत संपूर्ण सुविधा उपलब्ध प्राप्त असल्यामूळे कामकाज अधिक गतीमान होवून सामान्य माणसाला सुलभपणे न्याय मिळण्यास मदत होईल. सध्या सर्व न्यायालयात प्रक्रीयेत ई-फायलिंगचे काम सुरु आहे. यासाठी सर्व तांत्रिक सुविधा मिळेपर्यत ऑॅनलाईन आणि ऑफलाईन काम सुरु असावे असे महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनचे सदस्य बी.डी. साळुंखे यांनी यावेळी सांगितले. यावेळी बिलोलीचे जिल्हा न्यायाधीश कोठलीकर यांनी सर्वाचे आभार मानले.

सुरवातीला बिलोली येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या परिसरात मान्यवंराच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. बिलोली अभियोक्ता संघाचे ॲड. शिवकुमार नागनाथराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन न्यायाधीश श्रीमती हरणे मॅडम यांनी केले. तर आभार जिल्हा न्यायाधीश दिनेश कोठलीकर यांनी मानले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: