रामटेक – राजू कापसे
रविवार दिनांक 07/01/024 रोजी जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवून व सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवून शिवसेना (उ.बा.ठा.) पक्ष अधिक बळकट करण्याच्या अनुषंगाने व जनसंपर्क कार्यालय हे जनसेवेचे केंद्र बनावे या उदात्त हेतूने रामटेक विधानसभा प्रमुख श्री.विशालजी बरबटे यांच्या माध्यमातून कन्हान येथे पक्ष कार्यालय सुरु करण्यात आले.
या उदघाटन समारंभाप्रसंगी विशेष उपस्थिती म्हणुन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पूर्व विदर्भ संघटक श्री.सुरेश साखरे,रामटेक लोकसभा सहसंपर्क प्रमुख श्री.उत्तम कापसे,उपजिल्हा प्रमुख श्री.राधेश्याम हटवार,विधानसभा सल्लागार प्रमुख श्री.अरुण बनसोड,रामटेक विधानसभा सहसंपर्क प्रमुख श्री.सुत्तम मस्के,युवासेना जिल्हा प्रमुख लोकेश बावनकर,कामगार सेना जिल्हा प्रमुख श्री.समीर मेश्राम,कन्हान शहर प्रमुख श्री.प्रभाकर बावणे,
रामटेक शहर प्रमुख श्री.बादल कुंभलकर,रामटेक तालुका संघटक श्री.अनिल येळणे,पारशिवनी तालुका संघटक श्री.गणेश मस्के,मौदा संपर्क प्रमुख श्री.नरेश भोंदे,उपतालुका प्रमुख श्री.देवराव ठाकरे, रामटेक उपशहर प्रमुख श्री.सचिन देशमुख,
श्री.राहुल टोंगसे व रामटेक विधानसभा संघटिका सौ.दुर्गाताई कोचे,रामटेक तालुका महिला आघाडी प्रमुख सौ.कलाताई तिवारी इत्यादी सह विधानसभा,तालुका पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाची प्रस्तावना पारशिवनी तालुका प्रमुख श्री.कैलास खंडार यांनी तर संचालन व अभार रामटेक तालुका प्रमुख श्री.हेमराज चोखांद्रे यांनी केले. या उदघाटन प्रसंगी विधानसभेतील शिवसेनेचे सर्व मान्यवर पदाधिकारी महिला पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.