मूर्तीजापुर व दर्यापूर तालुक्याच्या वेशीवर असलेल्या तिर्थक्षेत्र लाखपुरी ता. मुर्तीजापुर जि.अकोला येथील पूर्णा नदी तीरावरील प्रसिद्ध श्री लक्षेश्वर देवालय येथे वर्षभर आयोजित कार्यक्रमाला उपस्थित संत, महात्मा, कथा वाचक, कीर्तनकार यांना आराम करीता स्व. सितारामजी परमसुखदासजी राठी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ श्री रमेशचंद्र राठी परिवार अकोला यांनी स्वखर्चातून बांधलेल्या संत निवासचा लोकार्पण सोहळा शुक्रवार दिनांक 10 नोव्हेंबर 2023 ला दुपारी 4 वाजता प.पू. महामंडलेश्वर कनकेश्वरीजी देवी यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
दुपारी 4 वाजता माताजीचे श्री लक्षेक्ष्वर संस्थान येथे आगमन , वारकरी महिला मंडळ , सेवाधारी महिला मंडळ द्वारा स्वागत व पदपूजन , भगवान लक्षेक्ष्वराचे माताजीच्या हस्ते पुजन व संत निवास लोकार्पण यानंतर माताजी मार्गदर्शन व दर्शन अशी कार्यक्रमाची रूपरेषा राहील . या कार्यक्रमाला अकोला येथील सद्गुरु परिवार सदस्य उपस्थित राहतील . परिसरातील भाविक भक्तांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन श्री लक्षेक्ष्वर संस्थान तर्फे करण्यात आले आहे .