अहेरी – महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे “प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास” केंद्राचे ऑनलाईन उदघाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले.त्या प्रसंगी मार्गदर्शन करताना कौशल्य विकासातून ग्रामीण विभागाची आर्थिक उन्नती साधा असे आवाहन नरेन्द्र मोदी,पंतप्रधान भारत सरकार ह्यांनी केले.सदर कार्यक्रमाला.
एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री (म. रा), देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री, अजित पवार, उपमुख्यमंत्री, मंगलप्रभात लोढा, मंत्री कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता हे हजर होते. सदर कार्यक्रमात सर्व मान्यवरांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी .संजय मिना, जिल्हाधिकारी गडचिरोली, आयुषी सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. गडचिरोली, व योगेंद्र शेंडे यांनी मोलाची कामगिरी बजावली.
सदर ऑनलाईन कार्यक्रम शासनाने मंजूर केलेल्या कौशल्य विकास केंद्र राजे धर्मराव कला – वाणिज्य महाविद्यालय, आलापल्ली च्या प्रांगणात पार पडला. याप्रसंगी मान्यवर म्हणून उपविभागीय अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मा. श्री. वैभववाघमारे (भाप्रसे) अहेरी, मा. श्री. मनोहर रामटेके, विस्तार अधिकारी पं. स., अहेरी, मा.श्री. विनोद आकनपल्लीवार,
उपसरपंच, ग्रा. पं, आलापल्ली, वैद्यकीय अधिकारी डॉ. कु. चालूरकर, मिलिंद खोंड, पत्रकार तसेच नागेपल्ली, आलापल्ली,अहेरी व परिसरातील गणमान्य मान्यवर आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मागील दोन दिवसापासून औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आलापल्ली चे नोडल ऑफिसर प्राचार्य श्री.एस.एम.भांडारकर तथा तांत्रिक सहाय्यक श्री. पि.ए. धुलसे, श्री. बी.एस.तुमसरे व औ. प्र. संस्था,
आलापल्ली चे समस्त कर्मचारी वृंद, प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र, आलापल्ली चे केंद्र संचालक श्री. निलेश बांबोडे तसेच राजे धर्मराव कला-वाणिज्य महाविद्यालय, आलापल्लीचे प्राचार्य डॉ. एम.यु.टिपले आणि समस्त प्राध्यापक व कर्मचारी वृंदानी मोलाची कामगिरी बजावली.
सदर कार्यक्रमाच्या ऑनलाईन उदघाटन प्रसंगी औ. प्र. संस्था, आलापल्ली, जिमलगट्टा आणि राजे धर्मराव कला – वाणिज्य महाविद्यालय, आलापल्ली चे एकूण 730 विद्यार्थी हजर होते.